नवे उत्पादन हे पारंपरिक फॉरेक्स कार्डासाठी किफायतशीर पर्याय
बेंगळुरू-
नव्या युगातील डिजिटल बँकिंग सेवा पुरवठादार नियोने पगारदार कर्मचाऱ्यांसाठी नियो जागतिक प्रवासी कार्ड लाँच केले असून ‘झिरो फॉरेक्स मार्क-अप’ असलेले हे पहिले फॉरेक्स कार्ड आहे. प्रवाशांना हे कार्ड वापरल्यानंतर नेहमीच्या फॉरेक्स कार्डप्रमाणे कोणत्याही चलन विनिमयावर प्रीमियम आणि आंतरराष्ट्रीय व्यवहार शुल्क भरावे लागणार नाही.
नियो जागतिक प्रवासी कार्ड खिशात असल्यावर प्रवाशांना नेहमीचे बहु- चलनी फॉरेक्स कार्ड किंवा ट्रॅव्हलर चेक्स जवळ न बाळगता १५० पेक्षा जास्त देशांत व ३५ मिलियन्स व्यापाऱ्यांकडे आंतरराष्ट्रीय व्यवहार किफायतशीरपणे करता येणार आहे.
किफायतशीरपणाखेरीज नियो जागतिक कार्ड इन्स्टंट डिजिटल ऑनबोर्डिंग, वापरकर्त्यांच्या बँक खात्यातून एनईएफटी/आयएमपीएसद्वारे सोयीस्कर लोडिंग अशा सुविधाही देते.
या कार्डाला अत्याधुनिक मोबाइल अॅपचा पाठिंबा देण्यात आला असून त्यामुळे ग्राहकाला कधीही आणि जगात कुठेही असताना पूर्ण कार्ड किंवा पेमेंट चॅनेल बंद किंवा खुले करण्याची क्षमता मिळते. हे अॅप कार्डाच्या वापरानुसार रियल- टाइम नोटिफिकेशन्स, विनिमयचा दर आणि रिफंड यांची माहिती देते तसेच वापरकर्त्याला त्याच्यासाठी सोयीस्कर एटीएम्सचे ठिकाण, जवलच्या ऑफर्स यांची माहिती उपलब्ध करून देत असल्यामुळे हे कार्ड आज जगातील सर्वात अत्याधुनिक कार्डांपैकी एक झाले आहे.
आणखी महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे, व्यावसायिक प्रवाशांना अॅपमध्येच प्रत्येक व्यवहाराचे बिल प्रवासातच समाविष्ट करण्याची सोय आहे. बिलाचे दावे त्यांच्या कंपनीला नियो कॉर्पोरेट पोर्टलद्वारे तत्क्षणी मंजूर करण्याची सोयही देण्यात आली आहेय
नियोचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि सह- संस्थापक विनय बाग्री म्हणाले, ‘भारतातील फॉरेक्स कार्ड बाजारपेठ १७ अब्ज डॉलर्सची असून यावर्षात सुमारे २० मिलियन्स लोक परदेशात प्रवास करतील असा अंदाज आहे. २०२० पर्यंत ही संख्या ५० मिलियन्सपर्यंत जाईल. परदेशात जाणाऱ्या भारतीय प्रवाशांची संख्या इतक्या वेगाने वाटत असताना बाजारपेठेत सिंहाचा वाटा काबीज करण्याचे आमचे ध्येय आहे.’
नियोचे सीटीओ आणि सहसंस्थापक विरेंदर बिश्त म्हणाले, ‘परकीय चलन हे प्रवासाचा प्रमुख भाग तसंच काळजीचा विषय असतो. आंतरराष्ट्रीय प्रवाशांना कायमच बँकांद्वारे आकारल्या जाणाऱ्या उच्च विनिमय दराचा ताण सहन करावा लागतो, जो व्यवहाराच्या रकमेच्या १-३ टक्के असतो. बँका चलन विनियम दराबरोबरच व्यवहार रकमेवर एकरकमी शुल्क किंवा विशिष्ट टक्केवारी आकारतात. त्याचबरोबर लोकांना परदेशात कार्डाच्या सुरक्षिततेचीही काळजी असते. आमचे कार्ड या सर्व अडचणींवर एकछत्री उपाययोजना देणारे आहे. सुरक्षा तसेच इतर घटक पुरवण्यासाठी आम्ही सर्वोत्तम प्रयत्न आणि डिझायनिंग प्रक्रियेच्या तंत्रज्ञानात गुंतवणूक केली आहे.’
विनय बाग्री आणि विरेंदर बिश्त यांनी स्थापन केलेली नियो आर्थिक सेवा, मनुष्यबळ सेवा व तंत्रज्ञान क्षेत्रात काम करते. जुलै २०१५ मध्ये नियोचे लाँच करण्यात आले होते आणि तेव्हापासून कंपनीने तीन हजारपेक्षा जास्त कॉर्पोरेट्स मिळवले असून या कंपन्यांमद्ये पाच लाख पगारदार कर्मचाऱ्यांद्वारे ते वापरले जाते.
नियो ही फिनटेक स्टार्अप २०१५ मध्ये सुरू करण्यात आली होती व ती विविध क्षेत्रांतील पगारदार कर्मचाऱ्यांना डिजिटल बँकिंग सेवा देते. सध्या पाच लाख ग्राहक आणि तीन हजार कॉर्पोरेट्स असलेली नियो भारतातील खऱ्या अर्थाने विश्वासार्ह डिजिटल बँकिंग व्यासपीठ म्हणून उदयास येत आहे.