- जेम्स अँड ज्वेलरी सेक्टरमधील एक सर्वात प्रतिष्ठेचे पुरस्कार
- 5 श्रेणींमध्ये 36 हून अधिक पुरस्कार
- जेम्स अँड ज्वेलरी उद्योगात पहिल्यांदाच कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी व विमेन आंत्रप्रिन्युअरशिप अॅवॉर्डचा समावेश
- विजेत्या विद्यार्थ्यांना देणार 10,00,000 रुपये मूल्यांच्या शिष्यवृत्ती
- पुरस्कारांसाठी अर्न्स्ट अँड यंग प्रक्रिया सल्लागार
- कार्यक्रम सीएनबीसी आवाजवर दाखवणार
मुंबई,- देशातील सर्वात मोठे असणारे व सर्वांना प्रतीक्षा असणारे जेम्स अँड ज्वेलरी पुन्हा आयोजित केले जाणार आहेत. ऑल इंडिया जेम अँड ज्वेलरी डोमेस्टिक कौन्सिलचा (जीजेसी) उपक्रम असणाऱ्या नॅशनल ज्वेलरी अॅवॉर्ड्स (एनजेए) 2018ने 2018 या वर्षासाठीच्या पुरस्कारांसाठी नामांकन प्रक्रिया सुरू केली आहे. जेम्स अँड ज्वेलरी उद्योगातील भारतीय कलाकुसर, सर्जनशील डिझाइन यांचा, तसेच भारतातील ज्वेलरी उत्पादक, घाऊक व किरकोळ विक्रेते यांचा व्यवसाय व मार्केटिंग कौशल्य यांचा गौरव करणे, हे या पुरस्कारांचे उद्दिष्ट आहे.
या वर्षी, एनजेए पुरस्कारांमध्ये ज्वेलरी अॅवॉर्ड्स (16 श्रेणी), एक्सलन्स अॅवॉर्ड्स (3 श्रेणी), स्टोअर अॅवॉर्ड्स (5 श्रेणी), डिझाइनर अँड आर्टिसन अॅवॉर्ड्स (3 श्रेणी) आणि स्टुडंट ऑफ द इयर अॅवॉर्ड अशा 5 श्रेणींमध्ये 36 पुरस्कार दिले जाणार आहेत. या वर्षी एनजेए अॅवॉर्ड्समध्ये सीएसआर उपक्रम व महिला उद्योजकता या नव्या श्रेणीचा समावेश करण्यात आला आहे.
एनजेए 2018 अॅवॉर्ड्समध्ये, आघाडीचे डिझाइनर्स, प्रोफेशनल्स व सेलिब्रेटी यांचा समावेश असणारे परीक्षक मंडळ समाविष्ट असणार आहे. या वर्षी पुरस्कारांसाठी प्रक्रिया सल्लागार म्हणून अर्न्स्ट अँड यंग काम पाहणार आहे आणि पुरस्कारांची छाननी व गुप्तता वाढवणार आहे. अंतिम फेरी 11 फेब्रुवारी 2019 रोडी, मुंबईतील ग्रँड हयात येथे होणार आहे आणि त्यासाठी सीएनबीसी आवाज ब्रॉडकास्ट पार्टनर आहे.
या पुरस्कारांविषयी बोलताना, जीजेसीचे अध्यक्ष नितीन खंडेलवाल यांनी सांगितले, “अनेक वर्षांपासून भारत समृद्ध डिझाइन व गुणवान कलाकारांसाठी लोकप्रिय आहे आणि हा जेम्स अँड ज्वेलरी क्षेत्राचा कणा आहे. प्रत्येक प्रदेश विशिष्ट डिझाइनसाठी लोकप्रिय आहे आणि त्याने जगभरातील ग्राहकांचे लक्ष वेधून घेतले आहे. जीजेसीने सुंदर ज्वेलरी डिझाइन व कुशल कलाकार यांच्या परंपरेची दखल घेण्यासाठी नेहमीच पुढाकार घेतला आहे. एनजेए अॅवॉर्ड्सच्या 8व्या वर्षामध्ये सहभागी होण्यासाठी पुढे यावे व या प्रतिष्ठित पुरस्कार समारंभासाठी स्वतःची नोंदणी करावी, असे आवाहन आम्ही देशभरातील ज्वेलरना जीजेसीच्या वतीने करत आहोत.”
जीजेसीचे उपाध्यक्ष व एनजेएचे समन्वयक अनंथा पद्मनाभन यांनी सांगितले, एनजेएने आमच्या सदस्यांसाठी व उद्योगासाठी मोठे व्यासपीठ व प्रचंड संधी निर्माण केल्या आहेत. जेम्स अँड ज्वेलरी उद्योगातील प्रत्येक घटकाची दखल घेतली जाईल व प्रसिद्धी मिळेल, याची दक्षता एनजेए घेईल. तसेच, अशा उपक्रमांमुळे या उद्योगाला एकत्र आणण्यासाठी आणि उत्कृष्टता व गुणवत्ता साध्य करण्यासाठी प्रयत्न केले जातील.
एनजेएचे सह-समन्वयक आशीष पेठे यांनी सांगितले, एनजेए ज्वेलरी उद्योगातील उत्कृष्ट व नावीन्यपूर्ण कार्याचा गौरव करणार आहे. स्पर्धा वाढते आहे आणि पुरस्कारांच्या यंदाच्या आठव्या वर्षात एनजेएने नवे पुरस्कार व नव्या श्रेणी यांचा समावेश केला आहे. जेम्स अँड ज्वेलरी उद्योगाचा प्रत्येक भाग करत असलेल्या कठोर परिश्रमाचा गौरव व्हायला हवा, असे आम्हाला वाटते. त्यामुळे, आम्ही युनिक ज्वेलरी, बेस्ट स्टोअर्स, इनोव्हेटिव्ह डिझाइन्स, आर्टिसन्स व स्टुडंट्स अशा श्रेणींनाही आम्ही संधी देत आहोत.
पुरस्काराच्या नामांकनामध्ये भारतभरातील ज्वेलर्स सहभागी होऊ शकतात आणि नामांकन सादर करण्याची शेवटची तारिख 10 जानेवारी 2019 आहे.
जीजेसीविषयी: ऑल इंडिया जेम अँड ज्वेलरी डोमेस्टिक कौन्सिल (जीजेसी) हे देशांतर्गत जेम्स अँड ज्वेलरी उद्योगातील उत्पादक, घाऊक व किरकोळ विक्रेते, वितरक, प्रयोगशाळा, जेमॉलॉजिस्ट, डिझाइनर व संबंधित सेवा यांचा समावेश असणाऱ्या 6,00,000 हून अधिक जणांचे प्रतिनिधीत्व करते. या क्षेत्राला चालना मिळावी व प्रगती व्हावी, तसेच उद्योगाचे हीतरक्षण व्हावे, या हेतूने हा उद्योग, त्याची कार्यपद्धती व उद्देश यासंबंधी परिपूर्ण दृष्टिकोन अंगिकारून हे कौन्सिल काम करते. गेली 14 वर्षे, जीजेसी या उद्योगासाठी व उद्योगाच्या वतीने विविध उपक्रमांचे आयोजन करून सरकार व व्यापार यांच्यामध्ये पूल बांधण्याचा प्रयत्न करत आहे. जीजेसी देशभरातील 6 लाखांहून अधिक जेम व ज्वेलरी व्यवसायांचे हित जपते.