Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0

स्टार हेल्थ इन्शुरन्सने अधिक वैशिष्ट्यांचा व कमी प्रीमिअमचा समावेश करून स्टार डायबिटीस सेफ इन्शुरन्स पॉलिसी नव्याने केली दाखल

Date:

सुधारित योजनेमध्ये प्रीमिअममध्ये 20% पर्यंत घट~

~सर्व प्रकारच्या डे केअर उपचारांचा समावेश~

 चेन्नई, तामिळनाडू, ऑगस्ट 21, 2018: स्टार हेल्थ अँड अॅलिड इन्शुरन्स कंपनी लि. या नावीन्यपूर्ण उत्पादनांसाठी लोकप्रिय असलेल्या, देशातील पहिल्या स्टँडअलोन आरोग्य विमा कंपनीने अधिक मूल्यांचा समावेश करून व प्रीमिअममध्ये घट करून स्टार डायबिटीस सेफ इन्शुरन्स पॉलिसी नव्याने दाखल केली आहे. स्टार डायबिटीस योजना आता 15%–20% कमी दरामध्ये खरेदी करता येऊ शकते.

नव्याने दाखल केलेल्या योजनेमध्ये विम्याच्या रकमेइतक्या वैयक्तिक अपघात कवचाबरोबरच, डॉक्टरांचे कन्सल्टेशन शुल्क, डायग्नॉस्टिक चार्जेसची भरपाई, फार्मसी बिले यांचाही समावेश करण्यात आला आहे. ग्राहकांना अतिशय कमी प्रीमिअममध्ये हे अतिरिक्त फायदे देण्यात येणार आहेत, म्हणजेच वर नमूद केलेल्या सेवांसाठी कोणताही अतिरिक्त खर्च करावा लागणार नाही.

मूळ योजनेनुसार, कितीही वर्षे डायबिटीस असलेल्या व्यक्तीला (नियमित हॉस्पिटलायझेशन कव्हरसह) कवच देण्यात आले व डायबिटीसची सद्यस्थिती काहीही असली तरी आरोग्य विमा कवच घेणे शक्य होते.

सध्या उपलब्ध असलेल्या कव्हरबरोबरच, सुधारित योजनेमध्ये सर्व प्रकारच्या डे केअर उपचारांचा समावेश करण्यात आला आहे; योजनेच्या बाबतीत झालेली ही अत्यंत महत्त्वाची घडामोड आहे, कारण अगोदर योजनेमध्ये केवळ 405 उपचारांचा समावेश होता.

योजनेतील बदलांविषयी बोलताना, डॉ. एस. प्रकाश, एफआरसीएस (Glasg), एफएआयएस, चीफ ऑपरेटिंग ऑफिसर, स्टार हेल्थ अँड अॅलिड इन्शुरन्स कं. लि. म्हणाले, “आमच्या ग्राहकांसाठी अतिरिक्त फायदे समाविष्ट करून, स्टार डायबिटीस सेफ इन्शुरन्स योजना नव्याने दाखल करताना आम्हाला अतिशय आनंद होत आहे. बाजारातून चांगला प्रतिसाद मिळत आहे व आमच्या सेल्स टीमकडूनही सकारात्मक प्रतिसाद मिळत आहे. यामुळेच आम्हाला या उत्पादनात सुधारणा करण्याची व डायबिटीस असलेल्या नागरिकांपर्यंत पोहोचण्याची प्रेरणा मिळाली. आज, स्टार डायबिटीस सेफ इन्शुरन्स पॉलिसी या क्षेत्रातील वैशिष्ट्यपूर्ण व एकमेव योजना आहे.”

“दाव्यांवर प्रक्रिया करण्यासाठी व आमची नावीन्यपूर्ण उत्पादने तयार करण्यासाठी आम्ही 400 वैद्यकीय कर्मचाऱ्यांना सहभागी करून घेतो. आमच्या कंपनीतील वैद्यकीय कर्मचारी उत्पादनांची आखणी करत असल्याने व सेवा देत असल्याने, ग्राहकांना परिणामकारक सेवा देण्यासाठी आम्हाला मदत करतात” असे डॉ. एस. प्रकाश, एफआरसीएस (Glasg), एफएआयएस, चीफ ऑपरेटिंग ऑफिसर, स्टार हेल्थ अँड अॅलिड इन्शुरन्स कं. लि., यांनी नमूद केले.

 डायबिटीस सेफ इन्शुरन्स पॉलिसी

  • सध्या टाइप I व II डायबिटीस असलेल्या व्यक्तींना ही योजना खरेदी करता येऊ शकते
  • प्री-पॉलिसी मेडिकल चेक-अप न करता योजना खरेदी करणे शक्य
  • मेडिक्लेम कव्हरबरोबरच, डायबिटीस व त्यातून निर्माण होणारी गुंतागुंत यांवरील उपचाराचा समावेश
  • इन्सुलिन व HbA1c वैद्यकीय चाचण्या यांच्या खर्चाचा समावेश

स्टार हेल्थ अँड अॅलिड इन्शुरन्स कं. लि.विषयी

स्टार हेल्थ अँड अॅलिड इन्शुरन्स कं. लि. ही भारतातील पहिली स्टँडअलोन आरोग्य विमा कंपनी आहे. कंपनीने बाजाराच्या वैविध्यपूर्ण गरजा पूर्ण करण्यासाठी अनेक प्रकारची अपूर्व विमा उत्पादने दाखल केली आहेत – कार्डिआक आजारांसाठी स्टार कार्डिआक केअर, सीनिअर सिटीझन्स हेल्थ इन्शुरन्ससाठी स्टार सीनिअर सिटिझन्स रेड कार्पेट व टाइप 1 व 2 डायबिटीस असलेल्यांसाठी स्टार डायबिटीस सेफ इन्शुरन्स. आरोग्याचे रक्षण करणे व आरोग्याविषयी जागृत करणे यासाठी देशभरातील ग्राहकांना सेवा देण्यासाठी स्टार हेल्थ अँड अॅलिड इन्शुरन्सकडे 300+ शाखा कार्यालये, 7600+ नेटवर्क हॉस्पिटल आहेत.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

अजित पवारांबरोबर नाहीच , महाविकास आघाडी म्हणूनच लढणार, खुद्द शरद पवारांची मान्यता – प्रशांत जगताप

पुणे- गेल्या काही दिवसांपासून पुणे महानगरपालिका निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस...

कोर्टाच्या आवारातच महिलेवर कारमध्ये सामूहिक अत्याचार

ठाणे- आर्थिक विषमता , सामाजिक विषमता या बरोबर ...