जवाहरलाल नेहरू यांच्या १३७ व्या जयंतीनिमित्त टिळक भवन येथे ‘भारतभाग्यविधाता’ विशेष कार्यक्रमाचे आयोजन

Date:

नेहरूंचे राष्ट्रउभारणीतील योगदान, विचार आणि आधुनिक भारताच्या जडणघडणीचा होणार जागर

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ, राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या खा. सुप्रिया सुळे आणि शिवसेनेचे नेते खा. संजय राऊत यांची प्रमुख उपस्थिती

मुंबई, दि. ११ नोव्हेंबर २०२६ :

भारताचे पहिले पंतप्रधान आणि आधुनिक भारताचे शिल्पकार पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या १३७ व्या जयंतीनिमित्त महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या वतीने ‘भारतभाग्यविधाता’ या विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या मार्गदर्शनाखाली रोजगार व स्वयंरोजगार विभाग आणि सांस्कृतिक विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने शुक्रवार, १३ नोव्हेंबर २०२६ रोजी सायंकाळी ४ ते ६.३० या वेळेत टिळक भवन, दादर, मुंबई येथे हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.

स्वातंत्र्योत्तर भारताच्या राष्ट्रउभारणीत पंडित जवाहरलाल नेहरू यांनी बजावलेली ऐतिहासिक भूमिका, औद्योगिक व आर्थिक विकासाची त्यांची दूरदृष्टी, शिक्षण, विज्ञान-तंत्रज्ञान आणि रोजगारनिर्मितीसाठी उभारलेली पायाभूत व्यवस्था तसेच लोकशाही, धर्मनिरपेक्षता आणि राष्ट्रीय एकात्मतेप्रती असलेली त्यांची अढळ निष्ठा या महत्त्वपूर्ण पैलूंवर या कार्यक्रमात विचारमंथन होणार आहे. नेहरूंच्या विचारांची आजच्या सामाजिक, आर्थिक आणि राजकीय परिस्थितीशी सांगड घालून त्यांच्या योगदानाचे महत्त्व नव्या पिढीसमोर मांडण्याचा या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश आहे.

या कार्यक्रमाला महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धनदादा सपकाळ, राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या व खासदार सुप्रिया सुळे, शिवसेनेचे नेते व खासदार संजय राऊत तसेच माजी खासदार कुमार केतकर हे प्रमुख वक्ते म्हणून उपस्थित राहणार आहेत. याशिवाय नाटक व चित्रपट दिग्दर्शक चंद्रकांत कुलकर्णी, कवी व सामाजिक कार्यकर्ते सायमन मार्टिन यांच्यासह कला, साहित्य, संस्कृती आणि सामाजिक क्षेत्रातील अनेक मान्यवरांची उपस्थिती लाभणार आहे.

या कार्यक्रमाच्या निमित्ताने पंडित नेहरू यांच्या विचारांवरील पुस्तकांचे प्रदर्शन व विक्री, त्यांच्या जीवनकार्यावर आधारित पोस्टर प्रदर्शन, विशेष प्रश्नमंजुषा, ‘भारत एक खोज’मधील निवडक भागांचे अभिवाचन आणि विशेष नाट्यसादरीकरण अशा विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. याशिवाय विविध क्षेत्रांत उल्लेखनीय योगदान देणाऱ्या व्यक्ती आणि संस्थांचा विशेष सन्मान करण्यात येणार आहे.

पंडित जवाहरलाल नेहरू यांनी आधुनिक भारताच्या उभारणीसाठी घातलेला भक्कम पाया, त्यांनी रुजवलेला वैज्ञानिक दृष्टिकोन आणि लोकशाही, धर्मनिरपेक्षता व सामाजिक एकात्मतेची मूल्ये आजही देशासाठी मार्गदर्शक आहेत. सध्याच्या काळात संविधानिक मूल्यांचे संरक्षण, लोकशाहीची बळकटी आणि सामाजिक एकात्मतेची जपणूक करण्यासाठी नेहरूंच्या विचारांचे स्मरण आणि प्रसार करणे अत्यंत महत्त्वाचे आहे.

या विशेष कार्यक्रमाला महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सर्व पदाधिकारी, विभागप्रमुख, जिल्हाध्यक्ष, ब्लॉक अध्यक्ष, विविध सेल व विभागांचे पदाधिकारी, कार्यकर्ते, साहित्यिक, कलाकार, विचारवंत आणि नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या वतीने करण्यात आले आहे.

कार्यक्रमाचा तपशील

कार्यक्रम : ‘भारतभाग्यविधाता’
दिनांक : शुक्रवार, १३ नोव्हेंबर २०२६
वेळ : सायंकाळी ४.०० ते ६.३०
स्थळ : टिळक भवन, दादर, मुंबई

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

धानाचे पीक संकटात, वाघांच्या दहशतीने शेतकरी हैराण; डॉ. नीलम गोऱ्हे थेट शेतकऱ्यांच्या बांधावर!

चंद्रपूरच्या नवरगावमध्ये शेतकरी आणि महिलांच्या व्यथा जाणून घेतल्या; वनमंत्र्यांवर...

आधुनिक भारताच्या उभारणीत पंडित नेहरूंचे योगदान; १४ नोव्हेंबरला पुण्यात विशेष व्याख्यानाचे आयोजन

‘भारत भाग्यविधाता’ उपक्रमांतर्गत शिक्षण, विज्ञान आणि लोकशाहीच्या विचारांचा जागर;...

अर्जुन रामपाल आणि प्रियमणीचा ‘द ब्लाइंड गेम’ ११ नोव्हेंबरला ZEE5 वर; दिवंगत दिग्दर्शक संगीथ सिवन यांचा अखेरचा चित्रपट!

पाच कोटी रुपयांच्या रहस्याभोवती फिरणारी गुन्हेगारी आणि थरारकथा; मैत्री,...