धर्मांतरण, घुसखोरी ही संपूर्ण देशाची समस्या : अविनाश धर्माधिकारी

Date:

दिलीपराज प्रकाशन प्रकाशित, अभिजित जोग लिखित ‘इदं न मम’ पुस्तकाचे प्रकाशन

पुणे : पूर्वांचल आणि आसाममध्ये होत असलेले धर्मांतरण तसेच घुसखोरी ही केवळ त्या भागांची समस्या नसून संपूर्ण भारताची समस्या आहे. विस्तारवादी, आक्रमक आणि गरजेला हिंसक होणाऱ्या धार्मिक शक्ती तेथे मोठ्या प्रमाणात कार्यरत आहेत. त्यांचा मुख्य हल्ला मूर्तीपूजकांवरच आहे. या धर्मांतरणाच्या पाठीशी अमेरिकेसारख्या जागतिक शक्ती आहेत. जमेल तर तलवार नाही तर व्यापार, अर्थव्यवस्था, राजकीय धोरण अशा हजारो प्रकारांनी मूळ संस्कृती सोडायला लावून धर्मांतरण करणे ही शेकडो वर्षांची परंपरा आता मोडून काढली पाहिजे. अशा वेळी देशाची वाटचाल आधी विश्र्वमित्र आणि आता विश्र्वगुरूकडे होणे आवश्यक आहे, असे आग्रही प्रतिपादन शिक्षणतज्ज्ञ, लेखक, विचारवंत अविनाश धर्माधिकारी यांनी केले. देशाचे विश्र्वगुरू होण्याचे स्वप्न हे लष्कराने जिंकून किंवा दुसऱ्या देशांच्या अर्थव्यवस्थेला टाचेखाली ठेवून आपल्या अटी मान्य करायला लावणे असे नसून या विश्र्वगुरुत्वातून जगाला अध्यात्म, अद्वैत आणि त्या द्वारे माणसाला माणूस जोडत नेत विश्र्वबंधुत्वाचा संदेश देणे आहे, असेही ते म्हणाले.

दिलीपराज प्रकाशन प्रकाशित आणि अभिजित जोग लिखित ‘इदं न मम : कहाणी पूर्वांचलाच्या परिवर्तनाची’ या पुस्तकाचा प्रकाशन समारंभ शनिवारी (दि. ३१) आयोजित करण्यात आला होता. पुस्तकाचे प्रकाशन अविनाश धर्माधिकारी यांच्या हस्ते झाले. त्या वेळी ते अध्यक्षपदावरून बोलत होते. नामवंत अभिनेते, दिग्दर्शक पद्मश्री डॉ. चंद्रप्रकाश द्विवेदी यांची सन्माननीय उपस्थिती होती. हरीभाऊ मिरासदार, दिलीपराज प्रकाशनचे संचालक राजीव बर्वे मंचावर होते. काळे हॉल, गोखले इन्स्टिट्यूट ऑफ पॉलिटिक्स अँड इकॉनॉमिक्स, बीएमसीसी रोड येथे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

भारताच्या पूर्वांचल भागातील संघाच्या कार्याचे ‘इदं न मम’ या पुस्तकाच्या माध्यमातून जसे दस्तावेजीकरण झाले आहे तसेच केरळमधील कार्याचे गांभीर्याने दस्तावेजीकरण होणे अत्यंत आवश्यक आहे, असे सांगून अविनाश धर्माधिकारी पुढे म्हणाले, अभिजीत जोग यांनी संघाचे पूर्वांचलातील काम मांडताना संघ परिवाराची पूर्ण पार्श्वभूमी योग्य पद्धतीने मांडली आहे. या प्रेरणादायक कहाणीतून पुढच्या काळामध्ये कामाला प्रवृत्त होणारी नवीन पिढी निर्माण होईल. बंगाल आणि पूर्वांचलातील परिस्थिती पाहता मतदार याद्यांचे शुद्धीकरण किती आवश्यक आहे हा मुद्दाही त्यांनी अधोरेखित केला.

डॉ. चंद्रप्रकाश द्विवेदी म्हणाले, पूर्वांचलाला प्रत्यक्ष भेट दिल्यानंतर तेथील परिस्थितीची जाणीव झाली. संघ प्रचारकांचे कार्य ‘इदं न मम’ या पुस्तकाच्या माध्यमातून समजासमोर येण्यास मदत होणार आहे. ते म्हणाले, लचित बोरफुकन हे पूर्वांचलातील एक महान योद्धा होते. त्यांचे कार्य विस्मरणात गेले होते. ते छत्रपती शिवाजी महाराजांप्रमाणे लढवय्ये होते. तेथील विद्यमान सरकार आणि इतिहासकारांच्या प्रयत्नांमुळे आज सार्वजनिक जीवनात त्यांचे कार्य समोर येत आहे. अभिजीत जोग लिखित ‘इदं न मम’ या पुस्तकाच्या माध्यमातून संघाच्या प्रचारकांचे कार्य जगासमोर येणार आहे.

पुस्तकाविषयी बोलताना अभिजीत जोग म्हणाले, इंग्रजांच्या फोडा व राज्य करा या भूमिकेतून पूर्वांचल मानसिकदृष्ट्या भारतापासून दुरावला गेला. त्यांचा भारतीयांशी संपर्क तुटत गेला आणि याचा फायदा दहशतवाद्यांनी घेतला. अशा परिस्थितीत मिशनरींनी मोठ्या प्रमाणात धर्मपरिवर्तन करण्यास सुरुवात केली तसेच या भागात घुसखोरी मोठ्या प्रमाणात वाढली. परंतु संघ कार्याच्या माध्यमातून हा प्रदेश पुन्हा एकदा भारताला जोडण्याचे महान कार्य सातत्याने सुरू आहे. हे कार्य समाजासमोर आणण्यासाठी या पुस्तकाचे लेखन केले आहे.

हरीभाऊ मिरासदार यांनी प्रकल्प संयोजक या नात्याने पुस्तकाच्या निर्मितीमागील भूमिका मांडताना पूर्वांचलातील सामाजिक, सांस्कृतिक आणि राजनैतिक बदल टिपण्याचा प्रयत्न करत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्याचे दस्तावेजीकरण व्हावे आणि समाजाला या कार्याचा परिचय व्हावा या हेतूने पुस्तकाची निर्मिती करण्यात आली आहे, असे सांगितले.

मधुर बर्वे यांनी प्रास्ताविक केले. राजीव बर्वे यांनी मान्यवरांचे स्वागत केले. स्नेहल दामले यांनी सूत्रसंचालन केले.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

पुण्यात अमली पदार्थविरोधी पथकाची कारवाई; मुंढव्यात ३ किलो २५ ग्रॅम गांजासह तरुण जेरबंद!

१ लाख ६१ हजारांचा मुद्देमाल जप्त; गुप्त माहितीच्या आधारे...

व्यवसायात जोखीम स्वीकारण्याची तरुणांची तयारी हवी:अनिरुद्ध देशपांडे यांचे मत; गश्मीर महाजनी, उमेश परिचारक यांना युवा पुरस्कार प्रदान

शुक्ल यजुर्वेदीय माध्यंदिन महाराष्ट्रीय ब्राह्मण मध्यवर्ती मंडळ याज्ञवल्क्य उद्योजक...