नानावाड्याच्या जतन-संवर्धनासाठी ६० लाखांचा खर्च ; दुरुस्तीची उर्वरित कामे मार्गी लागणार_स्थायी समितीचे अध्यक्ष श्रीनाथ भिमाले यांची माहिती

Date:

पुणे : शहराच्या ऐतिहासिक वारशाचे प्रतीक असलेल्या नानावाड्याच्या जतन आणि संवर्धनाच्या उर्वरित कामांसाठी पुणे महापालिकेकडून सुमारे ६० लाख रुपये खर्च करण्यात येणार आहेत. नानावाड्यातील दर्शनी भाग आणि दगडी इमारतीच्या दुरुस्तीची कामे या टप्प्यात हाती घेण्यात येणार असून, त्यासाठी महापालिकेच्या भवन आणि हेरिटेज विभागाने निविदा प्रक्रिया पूर्ण केली आहे. असे स्थायी समितीचे अध्यक्ष श्रीनाथ भिमाले यांनी सांगितले.

नानावाडा ही पुण्याच्या ऐतिहासिक आणि सांस्कृतिक वारशातील महत्त्वाची वास्तू आहे. या वास्तूचे जतन आणि संवर्धन करण्यासाठी महापालिकेकडून टप्प्याटप्प्याने कामे केली जात आहेत. त्याचाच पुढील भाग म्हणून दर्शनी भाग आणि दगडी इमारतीतील उर्वरित दुरुस्तीची कामे केली जाणार आहेत. यासाठी ५९ लाख ९४ हजार ७४२ रुपयांची तरतूद उपलब्ध असून, तेवढ्याच रकमेचे पूर्वगणनपत्रक तयार करण्यात आले आहे.

या कामांत इमारतीच्या दर्शनी भागातील खिडक्यांना लाकडी छज्जे बसविणे, त्यावर केम्प्रोल वॉटरप्रूफिंग करणे, छताची गळती रोखण्यासाठी दुरुस्ती करणे, रेकॉर्ड रूमची दुरुस्ती आणि रंगरंगोटी आदी कामांचा समावेश आहे. पावसामुळे छतामधून होणारी पाण्याची गळती तसेच इमारतीच्या दर्शनी भागातील दुरुस्तीची कामे केल्यामुळे वास्तूचे संरक्षण होण्यास मदत होणार आहे.

या कामासाठी दोन निविदा प्राप्त झाल्या होत्या. त्यापैकी दोन्ही निविदाधारक पात्र ठरले. निविदेतील जीएसटीची रक्कम ९ लाख १४ हजार ३६१ रुपये आहे. या कामासाठी २९ जून २०२६ रोजी खातेप्रमुखांची मान्यता घेण्यात आली होती. तसेच निविदा प्रक्रियेला संबंधित प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे.

नानावाड्याच्या जतन-संवर्धनाची उर्वरित कामे पूर्ण झाल्यानंतर या ऐतिहासिक वास्तूला अधिक चांगले स्वरूप प्राप्त होण्याबरोबरच पर्यटक आणि नागरिकांना उपलब्ध सुविधांचा लाभ घेता येणार आहे. ऐतिहासिक वास्तूचे मूळ स्वरूप जपतानाच तिचे संरक्षण आणि देखभाल करण्याच्या दृष्टीने हा टप्पा महत्त्वाचा ठरणार आहे.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

ऐतिहासिक पुणे कराराच्या शताब्दी वर्षासाठी महापालिकेचा पुढाकार

ऐतिहासिक दस्तऐवजांचे जतन, संशोधन आणि जनजागृतीवर भर स्थायी समितीची प्रस्तावाला...

पुण्यात न्यायालयाच्या कक्षातच राडा! पोलिसांसह न्यायालयीन कर्मचाऱ्यांना धक्काबुक्की; नऊ जणांविरुद्ध गुन्हा दाखल

न्यायालयीन कामकाजात अडथळा आणल्याप्रकरणी प्रत्येकी एक हजार रुपयांचा दंड;...

उजनी धरणावर २ हजार मेगावॅटचा फ्लोटिंग सोलार प्रकल्प

पुणे,दि.३१: उजनी धरण परिसरात प्रस्तावित फ्लोटिंग सोलार, बॅटरी स्टोरेज...