वीरमाता, वीरपत्नींच्या सन्मानासाठी साडेबारा लाखांची तरतूद:श्रीनाथ भिमाले यांची माहिती

Date:

‘वंदे मातरम् १५०’ उपक्रमासाठी स्थायी समितीची मान्यता

पुणे, ३० : देशाच्या रक्षणासाठी सर्वोच्च बलिदान देणाऱ्या वीर जवानांच्या माता आणि पत्नींचा पुणे महापालिकेतर्फे सन्मान करण्यात येणार आहे. ‘वंदे मातरम्’ या ऐतिहासिक राष्ट्रगीताच्या दीडशेव्या वर्षपूर्तीनिमित्त आयोजित ‘वंदे मातरम् १५० – संकल्प देशवासीयांचा, पुढाकार पुणेकरांचा’ या उपक्रमांतर्गत ५० वीरमाता आणि वीरपत्नींना प्रत्येकी २५ हजार रुपयांचा धनादेश देण्यात येणार आहे. त्यासाठी १२ लाख ५० हजार रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्याच्या प्रस्तावाला स्थायी समितीने मान्यता दिल्याची माहिती अध्यक्ष श्रीनाथ भिमाले यांनी दिली.

‘वंदे मातरम्’ गीताच्या दीडशेव्या वर्षपूर्तीनिमित्त पुणे शहरात विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे. त्याचाच एक भाग म्हणून ७ नोव्हेंबर २०२६ रोजी शनिवारवाडा येथे ३६ हजार दीपप्रज्वलनाचा विश्वविक्रमी कार्यक्रम आयोजित करण्यात येणार आहे. या ऐतिहासिक सोहळ्यात देशाच्या रक्षणासाठी बलिदान दिलेल्या वीर जवानांच्या माता आणि पत्नींचा सन्मान करण्यात येणार आहे.

या कार्यक्रमात एकूण ५० वीरमाता आणि वीरपत्नींना प्रत्येकी २५ हजार रुपयांप्रमाणे एकूण १२ लाख ५० हजार रुपयांचे धनादेश प्रदान करण्याचे नियोजन आहे. त्यासाठी महापालिकेच्या समाज विकास निधीतून आवश्यक रक्कम उपलब्ध करून देण्याचा प्रस्ताव प्रशासनाकडून स्थायी समितीसमोर ठेवण्यात आला होता. या प्रस्तावाला समितीने मान्यता दिली आहे.

देशाच्या रक्षणासाठी प्राणांची आहुती देणाऱ्या जवानांच्या कुटुंबीयांप्रती कृतज्ञता व्यक्त करणे आणि त्यांच्या त्यागाचा सन्मान करणे, हा या उपक्रमाचा उद्देश आहे. वीरमाता आणि वीरपत्नींच्या सन्मानासाठी आवश्यक निधी उपलब्ध करून देण्याबरोबरच संबंधित प्रशासकीय व आर्थिक कार्यवाही करण्यासही मान्यता देण्यात आली आहे.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

ऐतिहासिक पुणे कराराच्या शताब्दी वर्षासाठी महापालिकेचा पुढाकार

ऐतिहासिक दस्तऐवजांचे जतन, संशोधन आणि जनजागृतीवर भर स्थायी समितीची प्रस्तावाला...

पुण्यात न्यायालयाच्या कक्षातच राडा! पोलिसांसह न्यायालयीन कर्मचाऱ्यांना धक्काबुक्की; नऊ जणांविरुद्ध गुन्हा दाखल

न्यायालयीन कामकाजात अडथळा आणल्याप्रकरणी प्रत्येकी एक हजार रुपयांचा दंड;...