- मूळचा सोलापूरचा असणार MIDC चा कर्मचारी अंबादास गायकवाड व नंदूरबारच्या दुर्गम भागातील आदिवासी भागातील पहिला आंतरराष्ट्रीय गिर्यारोहक अनिल वसावे करणार किलीमांजारो शिखर सर करून विक्रम
MIDC चे CEO डॉ. अनबलगन व आदिवासी विकास महामंडळाचे सचिव डॉ. अनुप कुमार यादव यांच्या हस्ते मोहिमेचा फ्लॅग ऑफ
360 एक्सप्लोरर मार्फत एव्हरेस्टवीर आनंद बनसोडे यांच्या मार्गदर्शनाखाली 26 जानेवारी रोजी मोहीम
मुंबई( प्रतिनिधी): मूळचा सोलापूरचा असणारा व सध्या औरंगाबाद MIDC येथे सेवेत असणारा अंबादास गायकवाड व नंदुरबार च्या बालाघाट च्या दुर्गम भागातील पहिला गिर्यारोहक अनिल वसावे हे आफ्रिकेच्या सर्वोच्च शिखरावर चढाई करण्यासाठी निघाले असून मुंबई येथे MIDC चे CEO डॉ. अनबलगन व आदिवासी विकास महामंडळाचे सचिव डॉ. अनुप कुमार यादव यांच्या हस्ते मोहिमेचा फ्लॅग ऑफ यांनी या मोहिमेचा फ्लॅग ऑफ केला. 26 जानेवारी रोजी किलीमांजारो शिखरावर तिरंगा फडकवून प्रजासत्ताक दिन साजरा होणार आहे. देशातील “स्टार्ट-अप इंडिया” मार्फत भारत सरकारद्वारे प्रमाणित असणारी कंपनी 360 एक्सप्लोरर मार्फत या मोहिमेचे आयोजन केले गेले आहे. MIDC चा पहिला कर्मचारी व नंदुरबार भागातील पहिला आदिवासी मुलगा या मोहीमेअंतर्गत किलीमांजारो शिखरावर जात आहे त्यामुळे पूर्ण महाराष्ट्रासाठी हा अभिमानाचा क्षण ठरणार आहे.
अंबादास गायकवाड व अनिल वसावे हे 19 रोजी आफ्रिकेतील किलिमांजारो शिखर सर करण्यासाठी रविवारी रवाना झाले आहेत.
आफ्रिकेतील टांझानिया देशातील हे शिखर असून याची उंची समुद्र सपाटी पासून 19,341 फूट आहे. एव्हरेस्टवीर आनंद बनसोडे यांनी 15 ऑगस्ट 2014 रोजी हे शिखर सर करून त्यावर भारताचे राष्ट्रगीत वाजवून विश्वविक्रम केला होता. गेल्या 6 वर्षात महाराष्ट्र्र तसेच देशविदेशातील प्रोफेशनल गिर्यारोहक व ट्रेकर्स आनंद बनसोडे यांच्या मार्गदर्शनाखाली तयार झाले आहेत ज्यांनी आंतरराष्ट्रीय स्तरावर गिर्यारोहण केले आहे.
एव्हरेस्टवीर आनंद बनसोडेने स्थापन केलेल्या 360 एक्सप्लोरर मार्फत साहसी खेळाच्या प्रचार व प्रसारासाठी वेगवेगळ्या जागतिक मोहीम आखल्या जात आहेत त्या मध्ये वेगवेगळ्या खंडातील गिर्यारोहण, स्काय डायविंग, स्कुबा डायविंग हे सर्व समाविष्ट आहे. कोरोनानंतर आंतरराष्ट्रीय स्तरावर पहिलीच भारतीय मोहीम घेऊन जाण्याचा मान 360 एक्सप्लोररच्या नावावर आहे.
असून अत्यंत गरीब परिस्थितीतुन आलेला अंबादास गायकवाड व अनिल वसावे याने आनंद बनसोडे यांच्या मार्गदर्शनाखाली खडतर प्रशिक्षण केले आहे. संघर्षमय वाटचाल करून त्या दोघांनीहीआपली गिर्यारोहणाची आवड जोपासली आहे.
“माझ्यासाठी व पूर्ण MIDC परिवारासाठी हा अभिमानाचा क्षण ठरणार आहे. वडिलांच्या मृत्यूनंतर मला साथ देणारी आई, बायको व 2 मुली हे माझी सर्वोच्च ताकद आहेत. महाराष्ट्रातील अनेक मोठ्या व्यक्ती व 360 एक्सप्लोररमुळे या मोहिमेवर जाऊ शकत आहे.”
अंबादास गायकवाड (गिर्यारोहक)
“माझ्यासाठी व पूर्ण नंदुरबार व जळगाव साठी हा अभिमानाचा क्षण ठरणार आहे. मला साथ देणारे सर्व लोक माझी सर्वोच्च ताकद आहेत. महाराष्ट्रातील अनेक मोठ्या व्यक्ती व 360 एक्सप्लोररमुळे या मोहिमेवर जाऊ शकत आहे.”
अनिल वसावे (नंदुरबार मधील पहिला गिर्यारोहक)
” गिर्यारोहक म्हणून अंबादास गायकवाड व अनिल वसावे याचे प्रथम अभिनंदन. त्यांचे त्यांच्या स्वप्नावरील प्रेम व जिद्द याची तोड कशाशीही करता येणार नाही. 26 जानेवारी रोजी किलीमांजारो सर करून ते महाराष्ट्रपुढे एक आदर्श निर्माण करेल यात शंका नाही. यानंतर अनेक मुलांना आंतरराष्ट्रीय मोहिमेसाठी मार्गदर्शन करण्याचा विचार आहे.”
-आनंद बनसोडे