सेनाप्रमुख उद्धव ठाकरेंच्या विरुद्ध पुण्यातही शिवसेनेला सुरुंग
पुणे- स्वतः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पुण्यातील आपल्या समर्थक शिवसैनिकांशी आषाढी एकादशीच्या आदल्या रात्री संधान साधल्यानंतर आता आम्ही शिवसेनेतच आहोत असे सांगत सेनाप्रमुखांच्या विरोधात जाऊन त्यांना मुख्यमंत्री पदावरून राजीनामा देण्यास भाग पाडलेल्या बंडखोर आमदारांच्या ४० च्या गोटातील कोकणातील आमदार ,माजी शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी आज पत्रकार परिषद घेऊन पुण्यातून २ ते ३ हजार शिवसैनिक मुंबईत येऊन आमचे नेते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा सत्कार करणार असल्याचे जाहीर केले ,आज आपण पुण्यात नाना भानगिरे आणि अजय भोसले यांच्या मदतीने या मोठ्या सत्कार सोहळ्याचे नियोजन केल्याचे ते म्हणाले. यावेळी त्यांनी उद्धव ठाकरे हेच शिवसेना प्रमुख असल्याचे सांगितले आणि आम्ही उठाव केला होता याचा पुनरुच्चार करत आमचे नेते एकनाथ शिंदे असल्याचा उल्लेख पुन्हा केला .