‘विटेंज कार डिस्प्ले’ चे डॉ.विश्वजीत कदम यांच्या हस्ते उद्घाटन
पुणे :
भारती विद्यापीठाच्या सुवर्ण महोत्सवानिमित्त भारती विद्यापीठ दिल्ली कॅम्पसचा मेळावा पश्चिम विहार येथे यशस्वीरित्या पार पडला. विद्यापीठाचे सचिव डॉ. विश्वजीत कदम, आम आदमी पक्षाचे आमदार आणि माजी विद्यार्थी सौरभ भारद्वाज, व्यवस्थापनशास्त्र शाखेचे अधिष्ठाता डॉ. सचिन वेर्णेकर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. ‘विटेंज कार डिस्प्ले’ चे डॉ. विश्वजीत कदम यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले.
माजी विद्यार्थी चंदन सकुजा यांनी डॉ. विश्वजीत कदम यांचा सत्कार केला. माजी विद्यार्थी आदीत्य वीज यांच्या संग्रहातील 11 जुन्या आणि दुर्मिळ कार हे या मेळाव्याचे वैशिष्ट्य ठरले. मेळाव्याला संगणक व्यवस्थापन, अभियांत्रिकी, वैद्यकीय विज्ञान, विधी, आयुर्वेद आदी विभागाचे प्राध्यापक, शिक्षक आणि माजी विद्यार्थी तसेच देश -परदेशातून माजी विद्यार्थी उपस्थित होते.
1100 विद्यार्थी या मेळाव्याला उपस्थित होते. ‘शाम- ए- मिलाप हा गझलांचा कार्यक्रम तसेच ‘विटेंज कार डिस्प्ले’ हे आकर्षण होते. यावेळी प्रियदर्शन डुंबरे, सी. बी. सावंत, डॉ.विकासनाथ, डॉ. एस. एन. हुडा, डॉ. धर्मेंद्र कुमार, पारूल आगरवाल, वरूण श्रीवास्तव उपस्थित होते.