नवी दिल्ली – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे जगभर कौतुक होत असतानाच दुसरीकडे आज मोदी यांनी भारताचा अपमान केला, अशा आशयाचा #ModiInsultsIndia हा ट्रेंड ट्विटरवर सर्वांत वर दिसत आहे.
‘एक वर्षापूर्वी तुम्हाला भारतीय असल्याची लाज वाटत होती. मात्र देशातील सरकार बदलल्यानंतर तुम्हाला भारताचे प्रतिनिधी असल्याचा अभिमान वाटतो आहे,‘ अशा प्रकारचे वक्तव्य मोदी यांनी चीनमध्ये तेथील भारतीय समुदायाला संबोधित करताना शनिवारी केले होते. अशाच आशयाचे वक्तव्य त्यांनी सोमवारी दक्षिण कोरियाच्या दौऱ्यादरम्यान सोलमध्येही केले. “माझ्या पक्षाचे चिन्ह आणि तुमच्या देशाच्या राष्ट्रीय चिन्हात कमळ असल्यामुळे या देशाशी माझा वैयक्तिक संबंध निर्माण झाला आहे,‘ असे वक्तव्य मंगोलियाच्या दौऱ्यादरम्यान केले होते.
मोदींच्या या वक्तव्यांवर अनेक नेटिझन्सनी नाराजी व्यक्त केली होती. परिणामी, मंगळवारी (ता. 19) ट्विटरवर #ModiInsultsIndia हा ट्रेंड सुरू होता. आज या हॅशटॅगवर तीन लाख 80 हजारांपेक्षा अधिक जणांनी आपल्या प्रतिक्रिया दिल्या असून, त्यात वाढ होते आहे.

पंतप्रधान मोदी यांनी स्वत:च्या देशाचाच अपमान केला असल्याच्या प्रतिक्रिया अनेकांनी व्यक्त केल्या आहेत. “गुजरात भारतामध्येच आहे हे मोदींनी समजून घेण्याची गरज आहे‘, “तुम्हाला समजल्यापेक्षा भारत हा खूप मोठा देश आहे,‘ अशा तिखट शब्दांत नेटिझन्सनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.