पुणे – ली मेरिडिअन पंचतारांकित हॉटेलच्या पबमध्ये बंडगार्डन पोलिसांनी शुक्रवारी रात्री छापा टाकून बेकायदा अश्लील डान्स पार्टी उधळून लावली. या प्रकरणी पोलिसांनी महिंद्रा कंपनीचे क्षेत्रीय व्यवस्थापक, हॉटेल व्यवस्थापक आणि नऊ तरुणींसह 13 जणांना अटक केली आहे.
रेल्वे स्थानक परिसरातील ली मेरिडिअन हॉटेलमध्ये “स्क्रीम द क्लब‘ पब आहे. पोलिस आयुक्तांनी वर्षभरापूर्वी या पबचा परवाना रद्द केलेला आहे. तरीही या पबमध्ये डान्स पार्टीचे आयोजन केले होते. महिंद्रा कंपनीच्या एका क्षेत्रीय व्यवस्थापकाने दसरा-दिवाळी या कालावधीत वाहन विक्रीचे लक्ष्य पूर्ण करणाऱ्या वितरकांसाठी बक्षीस समारंभ ठेवला होता. त्यासोबतच डान्स पार्टीचेही आयोजन केले होते. त्यासाठी खास मुंबई येथून नऊ तरुणींना नृत्यासाठी बोलावले होते. “इव्हेंट‘ आयोजित करणाऱ्या लोहगाव येथील एका महिलेने त्या तरुणींना कार्यक्रमासाठी आणले होते.
मुंबईच्या एका व्यक्तीने पोलिसांना या डान्स पार्टीबाबत माहिती दिली होती. त्यावरून बंडगार्डन पोलिसांनी रात्री साडेदहाच्या सुमारास पबवर छापा टाकला. त्या वेळी तेथे तरुणी संगीताच्या तालावर अश्लील हावभाव करीत नृत्य करीत होत्या, अशी माहिती वरिष्ठ निरीक्षक शरद उगले यांनी दिली.
अटक केलेल्या संशयितांमध्ये कंपनीचे क्षेत्रीय व्यवस्थापक मनोजकुमार प्रेमनारायण गुप्ता (वय 42, रा. बाणेर-पाषाण लिंक रस्ता), कर्मचारी किरणपालसिंग अहलुवालिया (वय 43, रा. सिंध कॉलनी, औंध), शुभ्रनील एकनाथ करमाकर (वय 35, रा. मोरवाडी, पिंपरी), हॉटेल व्यवस्थापक अँड्य्रू मायकेल फ्रॅक्स (वय 46, रा. मोदीखाना, कॅम्प) आणि नऊ तरुणींचा समावेश आहे. न्यायालयाने त्यांची जामिनावर मुक्तता केली आहे, तसेच विनापरवाना पब चालविल्याप्रकरणी हॉटेलचे मालक राम अगरवाल यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.