Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0

महावितरणच्या कॉल सेंटरमध्ये संपर्क क्रमांक नोंद करणे झाले सोपे

Date:

 

नोंदीनंतर ग्राहक क्रमांक सांगण्याची गरज नाही

पुणे : वीजसेवेबाबत सर्व प्रकारच्या तक्रारी दाखल करण्यासाठी किंवा माहिती विचारण्यासाठी महावितरणने सुरु केलेल्या मध्यवर्ती ग्राहक सेवा केंद्ग (सेंट्रलाईज कस्टमर केअर सेंटर) मध्ये वीजग्राहकांना मोबाईल किंवा दूरध्वनी क्रमांक रजिस्टर्ड करणे सोपे झाले आहे. यापुढे रजिस्टर्ड केलेल्या संपर्क क्रमांकावरून कॉल सेंटरशी संपर्क साधल्यास तक्रारीसाठी ग्राहक क्रमांक सांगण्याची गरज भासणार नाही.

महावितरणच्या 24Í7 सुरु असणार्‍या कॉल सेंटरचे 18002003435 आणि 18002333435 हे दोन टोल फ्री क्रमांक उपलब्ध असून कोणत्याही कंपनीच्या मोबाईल किंवा दूरध्वनीद्वारे केअर सेंटरच्या या दोन्ही क्रमांकावर संपर्क साधता येतो. तसेच इंटरॅक्टीव्ह व्हॉईस रिस्पॉन्स सिस्टीमद्वारे (आयव्हीआरएस) वीजग्राहकांना मराठी, हिंदी व इंग्रजी भाषेत संपर्क साधण्याची सोय आहे. या कॉल सेंटरमुळे राज्यातील सर्व स्थानिक तक्रार निवारण केंद्गे (लोकल कम्प्लेंट सेंटर्स) 1 फेब्रुवारी 2014 पासून कायमस्वरुपी बंद केले आहेत.

वीजग्राहकांनी टोल फ्री क्रमांकावर तक्रार नोंदविण्यासाठी ग्राहक क्रमांक देणे आवश्यक आहे. त्याशिवाय कॉल सेंटरच्या तांत्रिक प्रणालीमध्ये तक्रारीची नोंद होऊ शकत नाही. प्रत्येक वेळी ग्राहक क्रमांक सांगण्याची गरज भासणार नाही, अशी सोय महावितरणने वीजग्राहकांसाठी केली आहे. वीजग्राहकांनी स्वतःचे जास्तीत जास्त दोन मोबाईल क्रमांक किंवा एक दूरध्वनी क्रमांक कॉल सेंटरमध्ये रजिस्टर्ड केल्यास कोणत्याही वेळी कॉल सेंटरशी संपर्क साधल्यानंतर तक्रारीसाठी ग्राहक क्रमांक सांगण्याची गरज नाही. वीजग्राहकांनी मोबाईल किंवा दूरध्वनी क्रमांक कॉलसेंटरमध्ये रजिस्टर्ड करण्यासाठी महावितरणकडून खास सोय करण्यात आली आहे.

यात कॉल सेंटरशी संपर्क झाल्यावर मराठीसाठी एक, इंग्रजीसाठी दोन व हिंदीसाठी तीन हे अंक दाबल्यानंतर ग्राहकांना भाषेची निवड करता येते व सहा अंक दाबल्यानंतर कॉल सेंटरमधील ग्राहक प्रतिनिधीशी थेट संपर्क होतो. यानंतर वीजग्राहकांना स्वतःच्या वीजग्राहक क्रमांकासोबत स्वतःचे मोबाईल किंवा दूरध्वनी क्रमांक ग्राहक प्रतिनिधींना सांगून रजिस्टर्ड करण्याची सोय आहे.

वीजग्राहकांनी रजिस्टर्ड केलेल्या तीनपैकी कोणत्याही एका मोबाईल किंवा दूरध्वनी क्रमांकावरून कॉल सेंटरशी संपर्क साधल्यास ग्राहकांना पुन्हा ग्राहक क्रमांक किंवा नाव, पत्ता आदी माहिती देणे गरजेचे नाही. ग्राहकाची माहिती आपोआप कॉल सेंटरच्या प्रतिनिधीला संगणकाद्वारे उपलब्ध होईल आणि ग्राहकांना केवळ तक्रारीचे स्वरुप सांगावे लागते. पुणे परिमंडलातील ज्या वीजग्राहकांनी कॉल सेंटरमध्ये स्वतःच्या ग्राहक क्रमांकासोबत मोबाईल किंवा दूरध्वनी क्रमांक रजिस्टर्ड केलेला नाही, त्यांनी या सेवेचा लाभ घ्यावा, असे आवाहन महावितरणने केले आहे

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

सरन्याधीश भूषण गवईंचा प्रोटोकॉल न पाळून भाजपा युती सरकारकडून अपमान, आंबेडकरी विचारांचे असल्याने अपमान केला का? : नाना पटोले

सरन्यायाधिशांचा अपमान करणाऱ्या अधिकाऱ्यांवर राज्य सरकार काय कारवाई करणार. राज्य...

पॉलिटेक्निक प्रथम वर्ष पदविका अभ्यासक्रमांची प्रवेश प्रक्रिया २० मे पासून सुरू

पदविका अभ्यासक्रम नोकरी व उद्योगासाठी उपयुक्त पर्याय; अधिकाधिक विद्यार्थ्यांनी...