पुणे ः
निरक्षर असलेल्या पण स्वकष्टाने भंगारमाल गोळा करण्याच्या व्यवसायातून पुढे आलेल्या सौ.बाळू मावशी सुदाम धुमाळ यांच्या पुढाकाराने वारकरी संप्रदाय (महाराष्ट्र), विठ्ठल रुक्मिणी मंदीर (माणगगवारेवाडी) सेवा समिती व रिहे पिंपळोली यांच्या वतीने जगन्नाथ पुरी यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. आज दिनांक 16 एप्रिल 2015 रोजी जगन्नाथ पुरी यात्रेस प्रस्थान केले. दिनांक 19 एप्रिल ते 23 एप्रिल 2015 रोजी होणार्या या जगन्नाथपुरी यात्रेत 200 वारकरी सहभागी झाले आहेत.
यात्रेचे संयोजन सौ. बाळू मावशी सुदाम धुमाळ (माण, मुळशी), ह.भ.प. सोमनाथ महाराज चौधरी (आळंदी) यांनी केले आहे.
या यात्रेच्या नियोजन समितीमध्ये नामदेव सोपान शिंदे, सीताराम विठ्ठल चव्हाण, विठ्ठल बाळकु शिंदे, पोपट तुकाराम वाघ, माणिकराव शिंदे, विलास रामचंद्र शिंदे, विठ्ठल गुजर, चंद्रकांत रोडे, बबन बलकवडे, विनायक गुजर आदींचा समावेश आहे. जगन्नाथ पुरी यात्रेत अखंड हरिनाम सप्ताह होणार आहे.
बाळूमावशी या हिंजवडीजवळ माण (गवारेवाडी) च्या रहिवासी असून, गेली अनेक वर्षे त्यांचा भंगारमालाचा व्यवसाय आहे. या आधी भंगार गोळा करण्याच्या व्यवसायातून मजल मारून गवारेवाडी येथे त्यांनी विठ्ठल रखुमाईच्या भव्य मंदिराची उभारणी केली आहे. त्यांच्या पुढाकारातून 83 वारकर्यांनी पुण्याहून विमानाने दिल्ली येथे जाऊन पुढे हरिद्वार, बद्रीनाथ, गंगोत्री, यमुनोत्री येथे तीर्थयात्रेसाठी मुळशी तालुका सांप्रदायिक दिंडीचे आयोजन केले होते.