पुणे – पुणे- दिल्ली आणि दिल्ली- पुणे मार्गावरील स्पाईस जेटच्या विमानांच्या उड्डाणाला गेले दोन दिवस होत असलेल्या विलंबामुळे प्रवासी वैतागले असून त्यांनी सोशल मिडिया वरून याबाबत आवाज उठवायला सुरुवात केली आहे. दरम्यान, तांत्रिक कारणांमुळे विमानाला उशीर होत असल्याचे ‘जेट’ने स्पष्ट केले आहे. विमान प्रवासाबाबत होणाऱ्या अशा ग्राहक-प्रवासी छळवादाबाबत आता कोणी प्रवासी संघ ,ग्राहक मंच यात लक्ष घालील कि नाही ,घातले तरी अशा समस्यांनी प्रवासी हैराण होतच राहील ? हे मात्र येणारा काळ च ठरविणार आहे.
दिल्ली- पुणे मार्गावरील विमान प्रवास अवघ्या २ तासाचा आहे .वेळ वाचवा म्हणून प्रवासी हजारो रुपये मोजतात आणि विमान प्रवास कडे वळतात. पण हल्ली विमाने लेट होतात आणि मनस्ताप वाढतो अशा अनुभवांची मालिका लांबलचक होते आहे . अशाच विमानाचे मंगळवारी सायंकाळी ४ वाजून ५५ मिनिटांनी पुण्याकडे उड्डाण होणे अपेक्षित होते. प्रत्यक्षात ते रात्री नऊच्या सुमारास झाले. प्रवासी विमानात बसलेले होते. परंतु, उड्डाण झाले नाही. त्यामुळे प्रवाशांनी सायंकाळी सहाच्या सुमारास वैतागून विचारणा केली. त्या वेळी विमानात तांत्रिक समस्या उद्भवल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे रात्री नऊ वाजेपर्यंत प्रवासी विमानातच बसून होते. तर बुधवारी सकाळी पुण्याहून दिल्लीला जाणारे विमानाचे सकाळी ७ वाजून २० मिनिटांनी उड्डाण होणे अपेक्षित होते. ते दिल्लीला सकाळी ९ वाजून ४० मिनिटांनी पोचणार होते. परंतु, त्या विमानाचे उड्डाण सकाळी अकराच्या सुमारास झाले. या बाबत जेटने म्हटले आहे की, पुणे विमातळावर सकाळी ९ ते ११ दरम्यान हवाई दलाचा सराव होतो. तसेच तांत्रिक कारणामुळेही विमानाचे उड्डाण होऊ शकले नाही. दरम्यान, या विलंबामुळे प्रवाशांनी ट्विटरवर जेटकडे नाराजी व्यक्त केली.