पुणे- सत्तेत असो किंवा नसो … तब्बल २७ वर्षे दिमाखदार सोहळा साजरा करतो आहे ‘पुणे फेस्टिव्हल ‘ दिवसेंदिवस रंगतदार होतो आहे याचा मला अभिमान आहे या सोहळ्यात अभिनेत्री हेमा मालिनी तब्बल २५ वर्षे सक्रीय सहभागी राहिली याबद्दल हि मला खूप कौतुक आहे असे वक्तव्य करीत २७ व्या पुणे फेस्टीव्हलचा रंगारंग कार्यक्रम आज पुण्याचे माजी खासदार सुरेश कलमाडी यांनी जाहीर केला . तारे तारकांची मांदियाळी , खचाखच करमणुकीचे कार्यक्रम … कलर्स मराठी च्या मालिका -शोज चा यावेळी होणारा झगमगाट अशी कित्येक वैशिष्टे यंदा या फेस्टिव्हल मध्ये दिसणार आहेत
पुणे फेस्टिव्हल जीवन गौरव पुरस्कार अभिनेते शशी कपूर आणि प्रेम चोप्रा यांना जाहीर करण्यात आला असून पुणे फेस्टिव्हल पुरस्कार जैकी श्रॉफ , अजय अतुल ,आणि दो उमा नटराजन यांना जाहीर करण्यात आला आहे
मुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीस, पालक मंत्री गिरीश बापट , केंद्रीय पर्यावरण राज्यमंत्री प्रकाश जावडेकर तसेच दिलीप कांबळे , विजय शिवतारे हे सत्ताधारी मंत्री ; माजी मंत्री हर्षवर्धन पाटील हे यंदा पुणे फेस्टिव्हल चे प्रमुख पाहुणे आहेत यामध्ये विशेष म्हणजे म्हैसूरचे महाराज यदुवीर कृष्ण्दत्त चामराजा वाडियार हे प्रमख अतिथी मधील वैशिष्ट्य असणार आहे.याशिवाय अभिनेता अनिल कपूर , अभिनेत्री पूनम ढिल्लो, बिंदू हेही आकर्षण असणार आहे
उद्घाटन सोहळ्याच्या सांस्कृतिक कार्यक्रमाचे प्रमुख डॉ. सतीश देसाई असतील . नेहमी गणेश वंदना , नवा ब्याले सदर करणाऱ्या हेमामालिनी यावेळी ‘श्रीकृष्ण वंदना ‘ हा नृत्य अविष्कार सादर करणार आहेत
अजय अतुल यांचा ‘मनाचा मुजरा ‘ कलर्स ची कॉमेडी ची बुलेट ट्रेन ;मराठी प्रेम गीतांचा प्रेम तुझा रंग कसा, उगवते तारे इंद्रधनू, शास्त्रीय संगीत मराठी कवी संमेलन, उर्दू मुशायरा, एकपात्री हास्य कलाकारांचा कार्य्रक्रम, महिला महोत्सव पेंटिंग प्रदर्शन, मिस पुणे फेस्टिवल, लावणी आणि भांगडा महोस्तव, केरळ महोस्तव अश्या विविधरंगी सांस्कृतिक कार्यक्रमांसह व्हिंटेज कार प्रदर्शन, गोल्फ क्लब टूर्नामेंट राज्यस्तरीय रोल बॉल स्पर्धा, मल्लखांब स्पर्धा, कुस्ती स्पर्धा अशा क्रीडा स्पर्धांचा यात समावेश असेल,
संतोष जुवेकर, मृणाल दुसाणीस, संस्कृती बालगुडे, शर्वरी जेमनीस, भार्गवी चिरमुले, प्रसाद ओक, पुष्कर श्रोत्री, तेजस्विनी पंडित, सारा श्रवण, आदि असंख्य कलाकारांचा समावेश असलेल्या विविध कार्यक्रमांचा यात समावेश आहे,
गणेश कला क्रीडा मंच, बालगंधर्व रंग मंदिर, यशवंतराव चव्हाण नाट्य गृह, भीमसेन कला दालन, पूना गोल्फ क्लब, मामासाहेब कुस्ती संकुल, आदि ठिकाणी हे सर्व कार्यक्रम होतील,
माजी खासदार सुरेश कलमाडी, डॉ. सतीश देसाई, डॉ. पी ए इनामदार , कृष्णकुमार गोयल कृष्णकांत कुदळे, काका धर्मावत,राजेंद्र गदादे, मनोहर नांदे, आदी मान्यवर या पत्रकार परिषदेला उपस्थित होते