Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0

‘जेट टॉय स्पर्धे’मध्ये ‘पंडितराव आगाशे स्कूल’ तर स्किमर स्पर्धेमध्ये ‘मिलेनियम नॅशनल स्कूल’विजयी

Date:

 पुणे :
‘एसएई’ इंडिया (सोसायटी ऑफ ऑटोमोटिव्ह इंजिनिअर्स), एआरएआय (ऑटोमोटिव्ह रिसर्च असोसिएशन ऑफ इंडिया), इटॉन टेक्नॉलॉजी, ‘जॉन डियर’, ‘कमिन्स इंडिया’ आणि डीसी डिझाईन यांच्या संयुक्त विद्यमाने पुण्यातील विद्यार्थ्यांसाठी वाहनांची छोटी मॉडेल्स तयार करण्याची ‘अ वर्ल्ड इन मोशन पुणे ऑलिंपिक 2015’ चे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये ‘जेट टॉय मेकिंग’ स्पर्धेत पंडितराव आगाशे स्कूल, लॉ कॉलेज रोड आणि ‘स्किमर मेकिंग’ स्पर्धेमध्ये मिलेनियम नॅशनल स्कूल, कर्वेनगर विजयी झाले.
इयत्ता सहावीसाठी घेण्यात आलेल्या जेट टॉय मेकिंग स्पर्धेमध्ये पंडितराव आगाशे स्कूल प्रथम क्रमांक, श्रीराम विद्यामंदीर  (भोसरी) ला उपविजेते पद मिळाले. इयत्ता पाचवीसाठी घेण्यात आलेल्या ‘स्किमर’ स्पर्धेमध्ये मिलेनियम नॅशनल स्कूल ने प्रथम क्रमांक मिळवला तर रामचंद्र गायकवाड स्कूल (दिघी) उपविजेते पद पटकावले.
विजेत्यांना अब्राहम जोसेफ (बजाज ऑटो लि. चे मुख्य तंत्रज्ञान अधिकारी) यांच्या हस्ते पारितोषिके देण्यात आली. यावेळी डॉ. के. सी. व्होरा (उपाध्यक्ष, एसएई इंडिया), रिचर्ड वीरलँड, बी. व्ही. श्यामसुंदर (सरव्यवस्थापक, एआरएआय) , इटॉन कंपनीचे श्रीकुमार पनिक्कर, (एम्बेडेड सिस्टीमचे प्रमुख), संजय कुलकर्णी (व्यवस्थापक, व्हेईकल बिझनेस), जॉन डिअरचे प्रमोद पाटील (सरव्यवस्थापक जॉन डिअर), रिचर्ड व्रिलॅण्ड (संचालक कमिन्स), कमलाकानन राजगोपालन् (संचालक ईबीयू इंडिया), विनोद पटेल, दिलीप छाब्रिया (व्यवस्थापकीय संचालक डीसी डिझाइन), स्वप्ना केळकर (ऑर्किड स्कूलच्या प्रमुख), संगीत कपूर (ऑर्किड स्कूलच्या उपमुख्याध्यापक) उपस्थित होते. स्पर्धेचे हे आठवे वर्ष आहे.
ऑर्किड स्कूल, बाणेर येथे ‘अ वर्ल्ड इन मोशन पुणे ऑलिंपिक 2015’ चे आयोजन करण्यात आले होते. 21 शाळांमधून 240 विद्यार्थी या स्पर्धेमध्ये सहभागी झाले.  ‘जेट टॉय’ निर्मिती स्पर्धेत 34 संघ सहभागी झाले.  ‘स्किमर निर्मिती’ स्पर्धेत 26 संघ सहभागी झाले.
 देशातील ऑटोमोबाईल अभियंत्यांची गरज वाढत असून, या क्षेत्रात कारकीर्द करण्याबद्दल जागृती निर्माण करणे हा या उपक्रमाचा उद्देश आहे. विज्ञान, गणित, तंत्रज्ञान आणि अभियांत्रिकीतील मूलतत्त्वे छोटी मॉडेल्स तयार करून शिकणे हा ‘अ वर्ल्ड इन मोशन’ या उपक्रमाचा उद्देश आहे. या स्पर्धांमधून देशाचे भावी ‘इंजिनीयर्स’ घडणार आहेत, असे बी. व्ही. श्यामसुंदर यांनी सांगितले.
स्पर्धेचा निकाल पुढीलप्रमाणे : 
 
Skimmer (5th Standard):
Sr. No. Category Name of The School
1 Ovearall Winner       S 17 – Millennium National School, Karve                                                   Nagar
2 Overall Runners-up    S2 – Ramchandra Gaikwad School, Dighi
3 Distance S21 – PMC School No. 152 B, Balewadi
4 Weight S7 – Mother Teresa High school, Kharadi
5 Accuracy S16 – Moledina School
S20 – The Orchid School
6 Speed S18 – KarntiveerVasudevBalwantPhadake                                                 School
7 Turn-ability S17 – Millennium National School, Karve                                                   Nagar
8 Presentation S13 – New English School, Sasane Naga
——————————————————————————————
Winning Teams:
Jet-Toy (6th Standard):
Sr. No. Category Name of The School
1 Ovearall Winner J34 – PanditraoAgashe School
2 Overall Runners-up J24 – Shriram VidyaMandir, Bhosari
3 Distance J34 – PanditraoAgashe School & J4 –                                                       SNBP School
4 Weight J13- Moledina School
5 Accuracy J15 – Millennium National School
6 Speed J11 – New English School, Sasane Nagar,
J29 – PMC School 152 B, Balewadi
J33 – PanditraoAgashe School
7 Time J7 – Mother Teresa High school, Kharadi
8 Presentation J9 – New English School Ramanbag
 
SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

‘श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती ट्रस्ट’च्यावतीने वासंतिक चंदन उटी सोहळ्याचे आयोजन

‘भारतीय वारकरी मंडळा’ची भजन सेवा पुणे– हिंदुस्थानातील पहिला सार्वजनिक गणपती...

महापालिकेतील कनिष्ठ अभियंत्याला 1 लाखाची लाच घेताना अटक

पुणे:पिंपरी महापालिकेत कनिष्ठ अभियंता म्हणून नोकरी करीत असलेल्यास...

“भारत गौरव ट्रेन – छत्रपती शिवाजी महाराज सर्किट” ९ जून पासून

पर्यटकांनी ऐतिहासिक़ पर्यटनाचा लाभ घ्यावा- पर्यटनमंत्री शंभूराज देसाईमुंबई, दि....