चाळीस मायक्रॅानपेक्षा जास्त जाडीच्या प्लॅस्टिकवर सरकार कडक कारवाई करणारः जावडेकर

Date:

 

लायन्स क्लब इंटरनॅशनलतर्फे आयोजित लायन्स इन्व्हॅारन्मेंट एक्स्पोचे उदघाटन संपन्न

1

पुणे : “चाळीस मायकॅानपेक्षा जास्त जाडीच्या प्लॅस्टिक पिशव्यांची निर्मिती करणा-या उत्पादकांनी स्वतःहून उत्पादन बंद करावे अन्यथा सरकार त्यांच्यावर कठोरात कठोर कारवाई करेल” असा इशारा केंद्रीय पर्यावरणमंत्री प्रकाश जावडेकर यांनी दिला. सध्या शहरात प्लस्टिकचा कचरा उग्र स्वरुप धारण करित आहे. चाळीस मायक्रॅानपेक्षा कमी जाडीचे प्लस्टिक वापरण्याचा कायदा आहे. मात्र, त्याची आजपर्यंत योग्य व कठोर अंमलबजावणी होत नसल्याचे त्यांनी नमुद केले.

‘लायन्स क्लब इंटरनॅशल 2015’ तर्फे ‘साखर संकुल, ‘ येथे आयोजित ‘लायन्स इन्व्हॅारन्मेंट एक्स्पो’ चे उध्दघाटन प्रसंगी ते बोलत होते.या प्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष लायन हसमुख मेहता लायन, इंटरनॅशनल डायरेक्टर लायन राजु मनवानी, कार्यक्रमाचे समन्वयक बाळासाहेब पाथरकर, डिस्ट्रिक्ट गर्व्हेनर लायन विक्रांत जाधव, जलसंपदा अधिक्षक अभियंत अतुल कपोले, पर्यावरण नियंत्रण मंडळाचे सचिन दत्तात्रय देवळे, लायन चंद्रहास शेट्टी, लायन अशोक मिस्त्री, हे उपस्थित होते. ते म्हणाले, “लायन्स क्लब पर्यावरण प्रदर्शनामध्ये पर्यावरण प्रदुषण रोखण्यासाठीच्या अनेक नाविन्यपुर्ण वस्तु बनविलेल्या आहेत. कदाचित त्यातून एक चांगली पर्यावरण चळवळ उभी राहु शकेल. पुणे शहरात दररोज पंधरा हजार टन कचरा जमा होतो त्यापैकी केवळ नऊ टन कचरा उचलला जातो. सहा हजार टन कचरा प्रति दिन शिल्लक पडून राहिल्याने वर्षाभरात वीस लाख टन कचरा शहरात तसाच शिल्लक राहिला जात आहे. त्यातून अनेक प्रश्न निर्माण होत आहेत. जनावरांच्या पोटात प्लॅस्टिक कचरा सर्वाधिक आढळतो. सर्वांना उपयुक्त व किफायतशीर अशा सोलर ऊर्जेच्या माध्यमातून एक लाख मेगावॅट वीजनिर्मिती करण्याचे ध्येय केंद्र सरकारने ठेवले आहे. दहा रुपयांमध्ये एलईडी बल्ब मिळवून देण्याची सुरुवात पंतप्रधानांनी केली असून तोही वीज बचतीचाच एक भाग आहे. लायन्स क्लब नेहमीच सेवाभावी कार्य करण्यासाठी सर्वात आगोदर पुढे येणारी संस्था आहे. त्यांना सरकार नेहमीच सोबत घेऊन काम करेल.”

ते पुढे म्हणाले, “प्रत्येक व्यक्ती, संस्था, सर्व स्तरावरील शासन, शासनकर्ते, स्वयंसेवी संस्था व प्रशासन यांनी आपल्या पासून पर्यावरण प्रदुषण कमी करुन पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी संवर्धन व जनजागृती करावी. पाणी, हवा, ध्वनी यासारख्या प्रदुषणाबाबत नागरिकांनी सतर्क रहावे. प्रदुषण नियंत्रणावरील नाविन्यपुर्ण व उपक्रमशील प्रयोग समोर यायला हवेत. त्यास शासन मदत व सहकार्य करेल. नवी स्मृतीवने व देवराई उभारणे काळाची गरज झाली आहे.” या प्रसंगी जावडेकर यांनी प्रदर्शनास पाहणी केली. प्लॅस्टिकच्या कच-यापासून तेल बनविणे, बटाट्यापासून वीजनिर्मिती, कच-यापासून इंधन निर्मिती यासारख्या प्रदर्शनामधील नाविन्यपुर्ण प्रयोगांची त्यांनी दखल घेतली. या प्रसंगी देबी गोएंगा(कॅान्झर्रवेशन अॅक्शन ट्रस्ट) व सुमैरा अब्दुलाई(आवाज फाऊंडेशन) या स्वयंसेवी संस्थांच्या प्रतिनिधींनी आपले मनोगत व्यक्त केले.

नागरिकांना पर्यावरणीय विषयांवर आधारित विद्यार्थी व स्वयंसेवी संस्था यांनी बनविलेल्या वस्तु आणि उपकरणे पाहण्याची संधी १७ व १८ तारखेपर्यंत प्रदर्शन साखर संकुल, शिवाजीनगर येथे असणार आहे.

लायन बाळासाहेब पाथरकर यांनी प्रस्ताविक केले. लायन हेमंत नाईक यांनी सुत्रसंचालन केले. लायन हसमुख मेहता यांनी आभार व्यक्त केले.

———————————————————————————————-

प्रकाश जावडेकरांच्या भाषणामधील ठळक मुद्देः

1) मुठा नदीमध्ये जल वाहतुक कधी सुरु होणार. असा प्रश्न त्यांनी महापालिकेला केला.

2) नदी सुधार योजना गेल्या पन्नास वर्षापासून मी ऐकत आलो आहे. मात्र, नदी सुधार काही झाली नाही. हजारो-करोडो रुपये फक्त त्यावर खर्च झाले.

3) हंजर, हंजर, हंजर…हंजर म्हणजे आता काही तरी जादु करणार असे वाटले होते. त्याकडे अनेकजण डोळे लावून बसले होते. पण कुठे आहे हंजर. तेच पळून गेले.

4) वारजे येथील मोकळ्या वन जमीनीवर नागरिकांच्या सहकार्याने मॅाडेल जंगल/वन निर्माण करण्याचे काम मी हाती घेणार आहे.

5) एक कलर, एक कोड व एक क्रमांक अशी माहिती असलेला फलक नागरिकांना हवा प्रदुषणाबाबत माहिती देण्यासाठी गल्लोगल्ली करण्यात येणार आहे.

६) कचरा उचलण्यासाठी कचरा कुंडी असली पाहिजे व ती आमच्या दारात नको, अशी आज सर्वांची अवस्था झाली आहे असे ते म्हणाले.

———————————————————————————————-

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

बायोफ्लॉक मत्स्यसंवर्धनाबाबत दोन दिवसीय प्रशिक्षण कार्यशाळेचे आयोजन

पुणे, दि. १८: बायोफ्लॉक मत्स्यसंवर्धन या आधुनिक तंत्रज्ञानाचे प्रशिक्षण...

खऱ्या भारताचा शोध घेण्यासाठी उघड्या डोळ्यांनी सामाजिक वास्तव पहा -पद्मश्री गिरीश प्रभुणे

पुणे,:सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या मुख्य इमारतीसमोरचा सावित्रीबाई फुलेंच्या पुतळ्याचा...