राष्ट्रवादी युवक काँग्रेसकडून राधा मोहन सिंह यांच्या राजीनाम्याची मागणी
पुणे :
केंद्रीय कृषिमंत्री राधामोहन सिंह यांनी शेतकऱ्यांच्या आत्महत्यांच्या बाबतीत अवमानकारक विधाने केल्याच्या निषेधार्थ रविवारी सकाळी राष्ट्रवादी युवक काँग्रेस च्या पुणे शहर शाखेने शहराध्यक्ष अजित बाबर यांच्या नेतृत्वाखाली सिटी प्राईड सातारा रस्ता चौकात जोरदार निदर्शने केली
शेतीचे प्रश्न माहित नसणारे आणि गांभीर्य नसलेले केंद्रीय कृषी मंत्री राधामोहन सिंह यांनी शेतकऱ्यांच्या आत्महत्यांमागे प्रेम प्रकरण आणि इतर अनेक कारणे असल्याचे सांगून शेतकऱ्यांच्या वेदनांची थट्टा केली आहे ,त्यामुळे त्यांनी तत्काळ राजीनामा द्यावा ‘ अशी मागणी शहराध्यक्ष अजित बाबर यांनी यावेळी बोलताना केली
यावेळी केंद्रीय सरकार विरोधी जोरदार घोषणा देण्यात आल्या . राष्ट्रवादी युवक काँग्रेस चे पर्वती विधानसभा अध्यक्ष सतीश वाघमारे ,शशिकला कुंभार ,नितीन कदम ,प्रसाद खमितकर ,निलेश माझिरे ,पवनराजे बम्बुळगे ,राजेंद्र दळवी ,अतुल हिंगमिरे ,श्रीकांत मेमाणे ,सुशांत बाबर ,वैभव कोठुळे ,रोहित मोरे ,उपस्थित होते