(समीक्षण )
कलाकार – अमृता सुभाष, अर्चित देवधर, पार्थ भालेराव, गौरीश गावडे, स्वानंद रायकर आणि अथर्व उपासनी
निर्माता – दिग्दर्शक अविनाश अरूण
निर्माता – दिग्दर्शक अविनाश अरूण
दर्जा ४/५
कोकणाच्या निसर्ग सौंदर्यात प्रेक्षकांना घेवून जाणारा , बालपणीच्या शालेय जीवनात नेणारा आणि कौटुंबिक समस्या अधोरेखीत करणारा असा ‘राष्ट्रीय पुरस्कार’ विजेता चित्रपट ‘किल्ला ‘कधी प्रेक्षकांना मनमुराद खळखळून हसवितो तर कधी अंतर्मुख व्हयला भाग पाडतो असाच आहे , लहान मुलांचे भावविश्व रेखाटणारे कितीतरी चित्रपट आपण पहिले असतील तरी एकदा तरी सिनेमागृहात जावून पाहून यावा असाच हा चित्रपट आहे
‘किल्ला’ ची कथा सुरू होते, चिनू आणि त्याच्या आईच्या नातेसंबंधाला बसलेल्या गाठींनी. आईच्या नोकरीतील बदलीमुळे पुण्यातून कोकणातल्या गुहागरला आलेला चिन्मय काळे आपल्याला दिसतो. पुण्यासाऱख्या शहरातून आपला मामा आणि
मामेभाऊ यांना सोडून कोकणात आल्यावर तो आईवर आणि एकंदरीत जीवनशैलीवर नाराजच असतो. पण नंतर हळूहळू चिन्मय नव्या वातवरणाशी जुळवून घेत असतानाच त्याच्या आयुष्यात त्याच्याच वर्गातील चार उनाड मित्र येतात.आणि शालेय जीवनातील धमाल मस्ती इथेच प्रेक्षकांचे धमाल मनोरंजन करते . काही दिवसांतच एकमेकांचे चांगले मित्र बनलेल्या या पाचही जणांच्या आयुष्यातला किल्ला हा महत्वाचा दूवा आहे. किल्ल्यात कधी भांडणं, कधी मैत्री, कधी मस्ती असं सगळं घडतं. वयात आलेला चिन्मय आणि त्याचे मित्र यांचा कधी एकत्र तर कधी एकटा प्रवास आपल्याला दिसतो. हा प्रवास पाहताना आपण त्यात गुंतत जातो, कधी शिकतं जातो, तर कधी आंतरमुख होतो.आणिप्रेक्षकांनाही हि कथा मधून मधून अंतर्मुख व्हायला भाग पाडते
कोकणच्या निसर्गसौंदर्याचा नितांत सुंदर अनुभूती हा चित्रपट देतो. दिग्दर्शक अविनाश अरूण याचा हा दिग्दर्शनाचा पहिला अनुभव असला तरी, तो उत्तम सिनेमॅटोग्राफर आहे आणि ते या चित्रपटातील अप्रतिम छायाचित्रणाने दिसून येतं. अगदी पहिल्या सीनपासून ते शेवटच्या सिक्वेन्सपर्यंत आपण हा चित्रानुभव एकटक पाहत राहतो. साधी सरळ पण मनाला भिडणारी कित्येकांना थोड्या बहुत फरकाने का होईनात पण आपल्या जीवनातील वाटणारी कथा हे यातलं वैशिष्ट्य.
या चित्रपटात अर्चित देवधर, पार्थ भालेराव, गौरीश गावडे, स्वानंद रायकर आणि अथर्व उपासनी या बालकलाकारांच्या मुख्य भूमिका आहेत. लहान असूनही अभिनयात सर्वाधिक उंची दाखविणाऱ्या या मुलांचे कौतुक क करावे तेवढे थोडकेच . अतिशय सहज, संयत अभिनय या सर्व मुलांकडून आपल्याला पाहायला मिळतो.यातला बंड्या लई भारी …

अर्थात हा चित्रपट केवळ लहान मुलांसाठी नाही तर मोठ्या माणसांसाठी प्रामुख्याने महत्वाचा ठरतो
पालक आणि त्यांच्या मुलांचं नातंही यात उलगडतं जातं. ऑफिस मधले ताणतणाव आईकडे आणि शालेय जीवनातातील मुलाचे भावविश्व यांचा हलकासा पण लक्ष्यवेधी संघर्षाचा प्रसंगही कौटुंबिक अवस्थेच वास्तव चित्रण करून जातो जो मनाला भिडल्याशिवाय राहत नाही फक्त चिनू आणि त्याची आईचं नाही, तर यत्त सर्वात भाव खावून जातो तो शाळेचा वर्ग आणि त्यातील मस्तीखोर मुले चित्रपट रंगवितात अगदी कोणताही फारसे किंवा डॉयलॉग नसलेल्या मुलींचे हि काम अप्रतिम झाले आहे .