पुणे:
पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. पक्ष कार्यालयामध्ये सकाळी महापौर दत्तात्रय धनकवडे यांच्या हस्ते केक कापण्यात आला. यावेळी स्थायी समिती अध्यक्ष अश्विनी कदम, अंकुश काकडे, रविंद्र माळवदकर, नगरसेवक फारूक इनामदार, अप्पा रेणूसे, विशाल तांबे, कमल ढोले-पाटील, अशोक राठी, नितीन उर्फ बबलू जाधव, राजलक्ष्मी भोसले, रूपाली चाकणकर, गोविंद थरकूडे, शालिनी जगताप आणि कार्यकर्ते उपस्थित होते.
पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेस च्या सामाजिक न्याय विभागाचे अध्यक्ष आनंद रिठे यांच्या वतीने गुरूवार पेठेतील सेंट मायकेल हॉस्टेल मधील अनाथ मुलांना खाऊ व फळांचे वाटप करण्यात आले.