पुना क्लब क्रिकेट मैदान व पीवायसी हिंदू जिमखाना येथे सुरू असलेल्या या स्पर्धेत साखळी फेरीत असिफ शेखच्या अष्टपैलू कामगिरीच्या जोरावर ऑल स्टेटस् संघाने गालाघर संघाचा 5 गडी राखून पराभव केला. पहिल्यांदा खेळताना तेजस कवडेच्या 44 धावांच्या बळावर गालाघर संघाने 19.4 षटकात सर्वबाद 119 धावा केल्या. ऑल स्टेटस् संघाकडून असिफ शेखने 4 तर सुमित रावतने 3 गडी बाद केले. 119 धावांचे लक्ष ऑल स्टेटस् संघाने केवळ16.3 षटकात 5 बाद 121 धावांसह पुर्ण केले यात असिफ शेखने 32 तर रवी गोहरने नाबाद 27 धावा करून संघाला विजय मिळवून दिला. असिफ शेख सामनावीर ठरला.
दुस-या लढतीत कमलेश रावलानीच्या अचूक गोलंदाजीच्या बळावर सनगार्ड एएस संघाने ईक्यु टेक्नॉलॅजीक संघाचा सर्व 10 गडी राखून दणदणीत पराभव केला. पहिल्यांदा खेळताना कमलेश रावलानीच्या अफलातून गोलंदाजीपुढे ईक्यु टेक्नॉलॅजीक संघ केवळ15.4 षटकात सर्वबाद 80 धावांत गारद झाला. कमलेशने केल 13 धावात 5 बळी घेतले. तर गित देसाईने 2 गडी बाद केले. 80 धावांचे लक्ष प्रशात पोळच्या नाबाद 37 तर पवन आनंदच्या नाबाद 47 धावांसह सनगार्ड एएस संघाने केवळ 7.1 षटकात एकही गडी न गमावता 86 धावांसह सहज पुर्ण केले. कमलेश रावलानी सामनावीर ठरला.
तिस-या लढतीत तुषार वैगणकरच्या अष्टपैलू कामगिरीच्या जोरावर केपीआयटी संघाने मर्क्स सघाचा 7 गडी राखून पराभव केला. पहिल्यांदा खेळताना मर्क्स संघाने 20 षटकात 6 बाद 128 धावा केल्या. यात राघव त्रिवेदीने 44 धावा करून संघाच्या डावाला आकार दिला. 128 धावांचे लक्ष तुषार वैगणकरच्या 41 व सुशांत मुदलीयारच्या 48 धावांच्या बळावर केपीआयटी संघाने 16.4 षटकात 3 बाद 131 धावांसह पुर्ण करत विजय मिळवला. तुषार वैगणकर सामनावीर ठरला.
स्पर्धेचा सविस्तर निकाल: साखळी फेरी:
गालाघर- 19.4 षटकात सर्वबाद 119 धावा(तेजस कवडे 44, शुबेंदू पांडे 25, गोरव बाजपई 21, असिफ शेख 4-24, सुमित रावत 3-13) पराभूत वि ऑल स्टेटस्-16.3 षटकात 5 बाद 121 धावा(असिफ शेख 32, रवी गोहर नाबाद 27, शुबेंदू पांडे 3-27) सामनावीर- असिफ शेख
ऑल स्टेटस् संघाने 5 गडी राखून सामना जिंकला.
ईक्यु टेक्नॉलॅजीक- 15.4 षटकात सर्वबाद 80 धावा(अभिजित अव्हाड 27, कमलेश रावलानी 5-13, गित देसाई 2-16) पराभूत वि सनगार्ड एएस- 7.1 षटकात 0 बाद 86 धावा(प्रशात पोळ नाबाद 37, पवन आनंद नाबाद 47) सामनावीर- कमलेश रावलानी
सनगार्ड एएस संघाने 10 गडी राखून सामना जिंकला.
मर्क्स- 20 षटकात 6 बाद 128 धावा(राघव त्रिवेदी 44, वेंकटेश अय्यर 26, शुर्वा भादुरी 26, बुर्हानउद्दीन भार्मल 2-27, निरंजन फडणवीस 2-7) पराभूत वि केपीआयटी- 16.4 षटकात 3 बाद 131 धावा(तुषार वैगणकर 41, सुशांत मुदलीयार 48, राघव त्रिवेदी 2-23) सामनावीर- तुषार वैगणकर
केपीआयटी संघाने 7 गडी राखून सामना जिंकला.