पुणे- येथील युएसके फौन्डेशन च्या वतीने आज क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंतीनिमित्त खडतर परिस्थितीतही स्त्री शिक्षणाचा सावित्रीमाईचा वसा पुढे नेवू पाहणाऱ्या बबाबाई लायगुडे आणि कुसुम सोनवणे या दोन चळवळीतील महिलांचा विशेष गौरव करण्यात आला .
मावळातील आजिवली या गावातील बबाबाई आणि मुळशी तील नांदगाव मधील कुसुम ताई यांनी घरच्या आणि समाजाच्या खडतर स्थितीला सामोरे जात स्वतःच्या सह अन्य शिक्षणापासून वंचित मुलींच्या शिक्षणासाठी आयुष्य पणाला लावण्याचे कार्य सुरु ठेवले आहे त्यांचा सन्मान फौन्डेशनच्या अध्यक्षा उषा काकडे यांनी केला .. पहा एक व्हिडीओ झलक