‘भारती विद्यापीठ अभियांत्रिकी महाविद्यालय’ आणि ‘नॅशनल युर्निव्हर्सिटी’ (अमेरिका) यांच्यात सहकार्य कराराबाबत बैठक
पुणे ः‘तंत्रशिक्षण आणि संशोधन’ या विषयात ‘भारती विद्यापीठाचे अभियांत्रिकी महाविद्यालय’ (कात्रज कॅम्पस) आणि अमेरिकेतील ‘नॅशनल युनिव्हर्सिटी’ यांच्यात परस्पर सहकार्य करार करण्यात येणार असल्याची माहिती ‘भारती विद्यापीठ अभियांत्रिकी महाविद्यालया’चे प्राचार्य डॉ.आनंद भालेराव यांनी दिली.या सहकार्य करारानुसार दोन्ही विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांना आंतरराष्ट्रीय शिक्षण, फिल्ड ट्रीप्स, दूरशिक्षण यांचा लाभ होणार आहे.
‘नॅशनल युनिव्हर्सिटी’च्या आंतरराष्ट्रीय विभागाचे उपाध्यक्ष डॉ. विल पोर्च यांनी ‘भारती विद्यापीठ अभियांत्रिकी महाविद्यालयाला’ मंगळवारी भेट दिली आणि डॉ. आनंद भालेराव यांच्याशी चर्चा करून सहकार्य कराराविषयी
चर्चा केली. ‘विद्यार्थी आणि प्राध्यापक यांना विविध शैक्षणिक संधींंसाठी प्रोत्साहन देण्यासाठी हा करार उपयोगी ठरेल,’ असे डॉ. आनंद भालेराव म्हणाले.