पुण्यात विक्री, उत्तम सेवा व सुविधा आणि ब्रँड आणि मालकी वाढवण्यासाठी पुण्यात ‘ढोणे फोर्ड’चे नवीन शोरूमचे उदघाटन नुकतेच करण्यात आले. मांजरी येथे पार पडलेल्या उद्घाटन समारंभाला फोर्डचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक अनुराग मेहरोत्रा हे प्रमुख उदघाटक म्हणून उपस्थित होते. याच बरोबर ढोणे फोर्डचे संचालक संतोष ढोणे, मनिषा तुपे, मि. तुपे असे मान्यवर या प्रसंगी उपस्थित होते. त्याच बरोबर पुण्यातील कोथरुड आणि वारजे मधील दालनांचे देखील उदघाटन करण्यात आले.
या वेळी फोर्डचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक अनुराग मेहरोत्रा म्हणाले की दर्जेदार सेवा आणि सर्वोत्तम सुविध त्याचबरोबर ग्राहक फोर्ड इंडियाकडून सर्वात तल्लख उत्पादक पोर्टफोलिओ अनुभवू शकतात. कारण इकोस्पोर्ट, एंडेव्हर, फोर्ड अस्पायर आणि सर्व-नवीन फिगो यांच्यासह अनेक कारचा ग्राहकांना अनुभव वाढविण्यासाठी आम्ही वचनबद्ध आहे.
ढोणे फोर्डेचे संचालक संतोष ढोणे म्हणाले की पुण्यातील नवीन ढोणे फोर्ड शोरूम फोर्डच्या सर्वांत उत्साही, वैशिष्ट्यपूर्ण प्रदर्शन करेल फोर्ड इकोस्पोर्ट्स, फोर्ड एंडेव्हर, फोर्ड अस्पायर, अशी फोर्डची नवीन उत्पादने आमच्या दालनात उपलब्द आहेत. या शिवाय आमच्याकडे स्वतःचे सर्व्हिस सेंटर देखील असून त्याचा फायदा ग्राहकांना नक्कीच होईल. एकाच छताखाली अनेक सेवा आंम्ही पुरवू असे ढोणे फोर्डचे संचालक संतोष ढोणे यांनी आयोजत केलेल्या पत्रकार परिषदेत म्हणाले.