पुणे- विरशैव लिंगायत गवळी समाज ट्रस्ट पुणे कॅम्प यांच्यावतीने चतुर्थ बिगरहुंडा सामुदायिक विवाह सोहळा उत्साहात संपन्न झाला . रास्ता पेठमधील टिळक आयुर्वेद महाविद्यालयाच्या मैदानावर आयोजित करण्यात आला होता .
या सामुदायिक विवाह सोहळ्यामध्ये १७ जोडप्यांचा विवाह करण्यात आला . यामध्ये साखरपुडा , जेवण , घोडा , बॅण्ड असा सर्व खर्च संयोजकांच्यावतीने देण्यात आले . यंदा या सामुदायिक विवाह सोहळ्याचे चवथे वर्ष होते . अशी माहिती सामुदायिक विवाह सोहळ्याचे संयोजक शैलेंद्र बिडकर यांनी दिली .
या विवाह सोहळ्यामध्ये माजी आमदार उल्हासदादा पवार , शिवसेना पुणे शहर नेते अजय भोसले , शिवसेना पुणे महापालिका गटनेते नगरसेवक संजय भोसले , पुणे कॅन्टोन्मेंट बोर्डाचे उपाध्यक्ष अतुल गायकवाड , नागरसेविका रुपाली शैलेंद्र बिडकर , पिंपरी चिंचवड महापालिकेचे नगरसेवक नारायण बहिरवाडे , खडकी कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या नगरसेविका वैशाली पहिलवान आदी मान्यवर उपस्थित होते .