पुणे- नाट्य आणि सिने सृष्टीतील अभिनेते रमेश भाटकर ,अशोक शिंदे आणि चेतन दळवी यांना सलाम पुणे पुरस्काराणे सन्मानित करण्यात आले . हे पुरस्कार भारत सरकारचे केंद्रीय आयुष मंत्री श्रीपाद नाईक ,आणि राज्याचे माजी शिक्षण मंत्री वसंतराव पुरके,अविनाश बागवे ,भाजपचे आनंद रेखी , संदीप खर्डेकर नगरसेविका मंजुश्री खर्डेकर, नगरसेवक गोपाळ चिंतल , सुनिता चिंतल आदी मान्यवरांच्या उपस्थितीत प्रदान करण्यात आले. हॉलीवूडचा बेस्ट अक्ट्रेस पुरस्कार विजेती बॉलीवूड ची अभिनेत्री किरण दुबे, दाक्षिणात्य सिनेमा गाजविणारी मराठी अभिनेत्री डिम्पल चोपडे यांच्यासह असंख्य मान्यवर कलावंतांच्या उपस्थितीत हा सोहळासंपन्न झाला .अभिनेता मयूर लोणकर ,अभिनेत्री राधा सागर ,मालविका बर्वे, नृत्यदिग्दर्शक सचिन घोरपडे आदी कलावंताच्या संचाकडून यावेळी गाणी नृत्य असा बहारदार कार्यक्रम यावेळी सादर करण्यात आला .तर स्वरध्यास संगीत विद्यालयाचे दत्तप्रसाद पांडे यांच्या मराठी गायनाच्या कार्यक्रमाने सोहळ्याचा प्रारंभ झाला .ज्येष्ठ सिनेपत्रकार आणि लेखक सुभाषचंद्र जाधव या कार्यक्रमाचे सूत्र संचालन आणि निवेदन केले