पुणे- म्यानमार मधील बर्मा येथे येथे मुस्लिम बांधवांवर होणाऱ्या हल्ल्यामध्ये अनेक मुस्लिम बांधव मारले गेलेया पार्श्वभूमीवर शांततेसाठी येथे मुस्लिम बांधवानी सामूहिक प्रार्थना केली . पुणे कॅम्पभागातील गोळीबार मैदानावर ईदगाह मैदानावर ईदगाह ट्रस्टच्यावतीने या प्रार्थनेचे आयोजन केले होते . यावेळी जामा मस्जिदचे मौलाना अय्युब अश्ररफी यांच्या मार्गदर्शनाखाली हि सामूहिक प्रार्थना झाली . यावेळी मौलाना कलिमुद्दीन यांनी देखील प्रार्थना केली . यावेळी मुस्लिम बांधवानी अश्रू वाहिले .
म्यानमार मध्ये मुस्लिम बांधवाना मारले जात आहे . हि माणुसकीला काळिमा फासणारी घटना आहे हे हल्ले थांबले पाहिजेत. म्यानमार सरकार चुकीच्या पद्धतीने वागत आहेत . तिथे चालणारी हिंसा हि थांबली गेली पाहिजे . तेथील मुस्लिम बांधवाना शीख बांधवानी मदतीचा हात दिला आहे . तसेच मुस्लिम धर्मगुरू देखील त्यांना मदतीसाठी प्रयत्न करत आहे . त्यासाठी आपण अल्लाकडे सुख आणि शांती नांदावी म्हणून त्यांच्यासाठी दुवामागू या , असे आवाहन जामा मस्जिदचे मौलाना अय्युब अश्ररफी यांनी केले .
यावेळी ईदगाह ट्रस्टच्यावतीने शीख बांधवानी माणुसकीच्या नात्याने तिथे केलेल्या मदतीबद्दल ज्ञानी अमरजितसिंग , हरभजन सिंग , मंजितसिंग विरदी , नेपालसिंग कल्याणी , अमरजितसिंग परिहार , देवेंद्रर सिंग याना शाल व पुष्पगुछ देउन आभार मानण्यात आले .
यावेळी मुस्लिम बांधवानी आर्थिक मदतीचे आवाहन केले , त्यावेळी मुस्लिम बांधवानी आर्थिक मदत जमा केली . यावेळी ईदगाह ट्रस्टचे विश्वस्त झैनुल काझी , मुस्ताक अलबुशरा , अमीन शेख , अहमद सय्यद , मोहम्मद हुसेन शेख , सरफराज शरीफ , मोइननुद्दीन शेख , वाहिद बियाबानी , अझीम गुडाकूवाला , इसाक चावीवाले , मुस्ताक पटेल , साजिद सय्यद , मुनावर खान , जावेद खान , सादिक लूकडे , ऍड. अयाज शेख व मोठ्या संख्येने मुस्लिम बांधव सहभागी झाले होते . या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन इकबाल अन्सारी यांनी केले .