पुणे -कॅम्प भागातील गोळीबार मैदानाजवळील हॅचिंग शाळेच्या गैरकारभाराविरोधात रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गट पुणे शहराच्यावतीने शाळेच्या प्रवेशद्वारावर तीव्र निदर्शने करण्यात आली . या शाळेमध्ये मध्यमवर्गीय , मागासवर्गीय विद्यार्थ्यांना डावलले जाते , प्रामुख्याने येथे पैसे भरल्यानंतर त्या मुलांचे प्रवेश दिले जातात . या शाळेच्या गैर कारभाराविरोधात आंदोलन करण्यात आले . दोन लाख रुपये भरा व प्रवेश घ्या अशा रितीचा फलक लावण्यात आला आहे . ज्या विद्यार्थ्यास प्रवेश दिल्यानंतर इमारत निधी विविध प्रकारचे निधी गेली अनेक वर्ष घेतात . परंतु शाळेमध्ये कुठल्याच प्रकारची नवीन इमारत किंवा डेव्हलपमेंट झालेली दिसत नाही यामध्ये सर्वच कारभार हा गैरकारभार पद्धतीने होत असल्याचे निदर्शनास आले आहे . या शाळेची मान्यता रद्द करण्याची मागणी माहिती रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीने दिलेल्या पत्रकात नमूद केलेले आहे .
या निदर्शनांतर शाळेच्या मुख्याध्यापिका यांची भेट रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या कार्यकर्त्यांनी केली , त्यावेळी आपल्या मागण्याविषयी चर्चा केली .
या आंदोलनात रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गट पुणे शहर नेते अशोक शिरोळे, संजय सोनवणे , शशिकांत मोरे , नरेश बनसोडे , शैलेश चव्हाण , मोहन जगताप , मधुकर काशीद , बाबुराव गायकवाड , बाळासाहेब जगताप , चिंतामण जगताप , अन्य पदाधिकारी व महिला सहभागी झाल्या होत्या .