पुणे- बोपोडी येथील नेत्र रुग्णालयाच्या विद्युत विषयक कामासाठी १ कोटी १५ लाखाची आवशक्यता असल्याने … कात्रज तलाव येथे आकर्षक विद्यूत रोषणाई आणि फुलराणी बोगद्याच्या कामासाठी ठेवलेले ७५ लाख तसेच शहराच्या प्रवेशद्वारावर कमान उभारण्यासाठी ठेवलेले ४० लाख वर्ग करून ते बोपोडीच्या नेत्र रुग्णालयाच्या कामास द्यावेत असा प्रस्ताव महापालिकेच्या मुख्य सभेत फेटाळण्यात आला . सभागृहनेता शंकर केमसे यांनी दिलेल्या प्रस्तावानानुसार हा प्रस्ताव २४ ऑगस्ट च्या स्थायी समिती च्या बैठकीत मंजूर झाला होता . त्यानंतर प्रशासनाने तो कालच्या मुख्य्साभेपुढे ठेवला असताना … कात्रज चे मनसे नगरसेवक यांनी आक्रमक पवित्रा घेतला त्यामुळे हा प्रस्ताव इथे फेटाळण्यात आला. यामुळे कात्रज तलावाच्या सुशोभीकरणासाठी ठेवलेले ७५ लाख त्याच कामासाठी उपलब्ध होणार आहेत .महापौर प्रशांत जगताप सभेच्या अध्यक्षस्थानी होते . पहा महापालिका सभेत याबाबत नेमके झाले तरी काय … ?