परिषदेत 400 बाल शिक्षणतज्ज्ञांचा सहभाग
पुणे :
बाल शिक्षण विषयावरील आंतरराष्ट्रीय परिषद नुकतीच पार पडली. ‘सस्टेनिंग एक्सलन्स इन अर्ली चाईल्ड हूड एज्युकेशन’ हा परिषदेचा विषय होता. या परिेषदेमध्ये अनेक मान्यवर तज्ज्ञांनी मार्गदर्शन केले. जगभरातून 400 बाल शिक्षणतज्ज्ञ या परिषदेत सहभागी झाले होते.
‘जंप स्टार्ट स्कूल’ ने या परिषदेमध्ये दोन पारितोषिके पटकाविली. आधुनिक तंत्रज्ञान वापरून शिक्षण पद्धती आणि पालकांशी प्रभावी
संवाद
या करीता ही पारितोषिके देण्यात आली. स्वाती पोपट-वत्स (अध्यक्ष, अर्ली चाईल्डहूड असोसिएशन) आणि सॅलेना फॉक्स (
टर्शरी
कॉलेज, न्युझीलंड)
यांच्या हस्ते
’
जंप स्टार्ट स्कूल
’
च्या वतीने स्नेहा तापडिया यांनी पारितोषिक स्वीकारले. ही परिषद हॉटेल वेस्टीन येथे पार पडली.
शिक्षणतज्ज्ञ स्नेहा तापडिया (पुणे)
यांनी बाल शिक्षण पद्धतीमध्ये बदल करून विद्यार्थ्यांना कशाप्रकारे ज्ञान देता येईल या विषयी मार्गदर्शन केले. स्नेहा तापडिया यांना या क्षेत्रातील 8 वर्षांचा अनुभव आहे. बाल शिक्षण पद्धतीमध्ये नेहमीची पद्धतीत बदल केल्यास विद्यार्थ्यांना ते घेत असलेल्या शिक्षणामध्ये कुतूहल निर्माण होऊ शकते.
निर्वाण बिर्ला यांच्या हस्ते परिषदेचे उदघाटन झाले. डॉ. स्वरूप संपत (असोसिएशनचे उपाध्यक्ष), प्रबोध राजन, सुषमा नायर (
टर्शरी
कॉलेज, न्युझीलंड), डॉ.रिता सोनावत, स्वाती पोपट-वत्स आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.
या परिषदेमध्ये सर्व प्री-स्कूल, बालवाडी, स्वयंसेवी संस्था, लहान मुलांचे क्लासेस, पालक, माध्यमे आणि बालकांसाठी विविध उत्पादने करणार्या कंपन्या, मीडिया हाऊस यांनी एकत्र येऊन विद्यार्थ्यांची काळजी, विकास, शिक्षण गुणवत्ता यामध्ये बदल घडविणे गरजेचे आहे. तसेच बाल वयातील ताण कमी व्हावा यासाठी कोणकोणत्या उपाययोजना करता येतील यावरील विचारमंथन देखील याविषयी चर्चा केली.