‘हॅन्ड्स ऑफ इंडिया’तर्फे भव्य सुती वस्त्रांचे प्रदर्शन
पुणे- हॅन्ड्स ऑफ इंडिया ही २०१० साली स्थापन झालेली संस्था भारतातील विविध भागातील विणकर तसेच हस्त-भरतकाम करणाऱ्या लोकांसमवेत काम करते. हॅन्ड्स ऑफ इंडियातर्फे महिलांसाठीचे हातांनी बनवलेले सुती वस्त्र तसेच घरगुती फर्निचर तयार करण्यासाठी या कलाकारांना प्रोत्साहीत केले जाते. हातमाग, हस्तकला हस्त-भरतकाम यांच्याकडे लक्ष वेधण्यासाठी तसेच छोट्या-छोट्या खेड्यांतील गरीब व गरजू मात्र कलेने समृद्ध अशा लोकांच्या हाताला काम मिळवून द्यावे हा या संस्थेचा प्रमुख उद्देश आहे. त्याचसोबत बदलत्या काळात लोप पावत चाललेली भारताची ही अद्वितीय कला टिकवून ठेवण्याचे हॅन्ड्स ऑफ इंडियाचे प्रयत्न आहेत.
भारतातील विविध भागातील १५०० कलाकारांच्या ५० गटांसमवेत हॅन्ड्स ऑफ इंडिया काम करते. तसेच वृंदावन, उत्तर प्रदेश येथे तब्बल ८० लोकांसमवेत ऑनलाईन वेबसाईटदेखील चालवली जाते.
हॅन्ड्स ऑफ इंडियाचे पुण्यात दरवर्षी दोन प्रदर्शन होतात. येत्या १७ मार्चपासून हे प्रदर्शन पुन्हा होऊ घातले आहे. टिळक स्मारक मंदिरात १७ ते २१ मार्चपर्यंत रोज सकाळी ९.३० ते रात्री ८.३० पर्यंत तुम्ही या प्रदर्शनाचा लाभ घेऊ शकता. सर्वोत्तम सुती कापडाच्या साहाय्याने हातांनी बनवण्यात आलेल्या अतिशय सुंदर वस्त्रांचे हे प्रदर्शन आहे. अंगाची लाहीलाही करून सोडणाऱ्या उन्हाच्या झळा कमी करण्यासाठी या वस्त्रांचा चांगलाच उपयोग पुणेकरांना होईल. यामध्ये पंजाबमधील पुलकारी, उत्तर प्रदेशातील चिकन, पॅटीवर्क व आरी, पश्चिम बंगालमधील कांथा तसेच इंग्लिश भरतकाम, बिहारमधून सुजनी काम, काश्मीरमधील लोकप्रिय सोजनी व काशिदा यांसह कर्नाटकातील कासुटी या प्रकारचे भरतकाम केलेली वस्त्रे असतील.
खास उन्हाळ्यासाठी तयार करण्यात आलेला बरामा विणकाम केलेला मेखला कुर्ता, बांधणी कुर्ता, सुती स्कर्ट, डाबका अजराख कुर्ता, ओरिसातील ब्लेंडेड डाय केलेली पाश्चिमात्य धाटणीची वस्त्रे, सण-मुहूर्तांसाठी चंदेरी सिल्क तसेच कळमकरी, मंगलगिरी, इकत, डोंगरिया, माहेश्वरी, फुलिया साड्या दुपट्टा ही हॅन्ड्स ऑफ इंडियाची विशेष उत्पादने आहेत.
प्रदर्शनाची वेळ व पत्ता
दिवस – १७ ते २१ मार्च २०१७,
वेळ – सकाळी ९.३० ते रात्री ८.३० पर्यंत
स्थान – टिळक स्मारक मंदिर, टिळक रोड, सदाशिव पेठ, पुणे.
मोबा. 9845227919, 9045505465
वेबसाईट – www.handsofindia.com
www.facebook.com/handsofindia