चिंचवडच्या सांगलीकरांकडून सांगली जि. प अध्यक्ष संग्रामसिंह देशमुखांसह मान्यवरांचा सन्मान
चिंचवड – मूळचे सांगलीकर पण पुणे-पिंपरी चिंचवड परिसरात स्थायिक झालेल्या सांगलीकरांवतीने सांगली जि. प. चे नूतन अध्यक्ष संग्रामसिंह देशमुख, यांच्यासह मान्यवरांचा सत्कार-सन्मान सोहळा काल पिंपरी-चिंचवड चे महापौर नितीन काळजे व उपमहापौर शैलजा मोरे यांच्याहस्ते पिंपरी येथील आचार्य अत्रे सभागृहामध्ये उत्साहात पार पडला.
गॅलॅक्षी कॅरिअर्स अकॅडेमी मार्फत अशोक करांडे यांचे विध्यार्थ्यांसाठी मोफत करिअर मार्गदर्शन शिबीर व सांगली जि. प. चे नूतन अध्यक्ष संग्रामसिंह देशमुख यांच्यासह मान्यवरांच्या सत्कार सोहळ्याचे आयोजन चिंचवड स्थित सांगलीकरांच्या वतीने करण्यात आले होते. यावेळी महाराष्ट्र राज्य मजूर फेडेरेशन चे अध्यक्ष सतीश देशमुख, नगरसेविका करुणाताई चिंचवडे, नगरसेवक विलास मडिगेरी, जितेंद्र पवार, सातारा-सांगली जिल्हा मित्र मंडळाचे संस्थापक सुनील जाधव, सांगली जिल्हा मित्र मंडळाचे अध्यक्ष रणजित औटे, उद्योजक विठ्ठल मोहिते, सामाजिक कार्यकर्ते शेखर चिंचवडे व एकता सामाजिक संस्थेचे अध्यक्ष प्रा. चेतन दिवाण यांची प्रमुख उपस्थिती होती.
कार्यक्रमावेळी बोलताना महापौर नितीन काळजे यांनी आजच्या स्पर्धेच्या युगात विध्यार्थ्यांना योग्य करिअर मार्गदर्शनाची गरज असून त्यासाठी पालकांची जबाबदारी मोठी असल्याची प्रतिक्रिया व्यक्त केली. उपमहापौर शैलजा मोरे यांनी पालकांवर विद्यार्थ्यांच्या करिअर निवडीप्रसंगी विध्यार्थ्यांना आधार व मार्गदर्शनाची गरज असताना दुर्दैवाने बहुतांशी पालक वर्ग पाल्याला पुरेसा वेळ देत नसल्याची खंत व्यक्त केली.
सांगलीकरांकडून करण्यात आलेल्या सत्कारास उत्तर देताना संग्रामसिंह देशमुख यांनी हा सन्मान म्हणजे घरच्या लोकांनी आपल्या पाठीवर ठेवलेला हात असून पुणे- चिंचवड मधील सांगलीकर बांधवांच्या सर्व अडी-अडचणी सोडविण्यासाठी आपण सदैव तत्पर असल्याची भावना व्यक्त केली.
कार्यक्रमाच्या सुरुवातीस अशोक करांडे यांनी विद्यार्थी-पालकांशी मुक्त संवाद साधत करिअरच्या विविध संधींबाबत उपस्थिताना मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी गॅलॅक्षी कॅरिअर्स चे अशोक करांडे, रणजित औटे, प्रा. चेतन दिवाण, चंद्रकांत मोहिते, सुरेश मुळीक यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संदीप चव्हाण यांनी केले तर आभार चंद्रकांत मोहिते यांनी मानले.