पुणे -महाराष्ट्र सार्वजनिक ग्रंथालये अधिनियम 1967 व या अधिनियमाच्याअंमलबजावणीसाठी तयार करण्यात आलेल्या नियमामध्ये सुधारणा करण्यासाठी ग्रंथालय संचालकसु. हि. राठोड यांच्या अध्यक्षतेखाली गठीत केलेल्या सुधारणा समितीची पुणे विभागाची बैठकरविवार दिनांक 25 ऑगस्ट 2019 रोजी पुणे मराठी ग्रंथालय व मोफत वाचनालय, केशव सभागृह,नारायण पेठ, पुणे येथे सकाळी 11 वाजता आयोजित करण्यात आली आहे.
जिल्हयातील सर्व शासनमान्य ग्रंथालयांचे ग्रंथपाल, अध्यक्ष, सचिव, कार्यवाह, जिल्हा ग्रंथालय संघाचे अध्यक्ष व कार्यवाह, तसेच ग्रंथालय चळवळीशी संबंधीत स्थानिक लेखक, साहित्यिक, वृत्तपत्रसंपादक, मुद्रक, प्रकाशक, ग्रंथ विक्रेते, शासनमान्य ग्रंथालयांचे पदाधिकारी, कार्यकर्ते, सेवक, वाचकव सभासद, शैक्षणिक ग्रंथापाल, ग्रंथालय व्यावसायिक, संस्था, लोकप्रतिनिधी, महिला, जनता,महाविद्यालय, विद्यापिठीय ग्रंथालय व माहितीशास्त्राचे प्राध्यापक, संचालनायातील माजीअधिकारी व कर्मचारी ज्या कोणाला महाराष्ट्र सार्वजनिक ग्रंथालये अधिनियम 1967 व त्याच्याअंमलबजावणीसाठी तयार करण्यात आलेल्या नियमात काही सुधारणा सुचवायच्या असतील अशासर्व व्यक्तींना उपस्थित राहण्याचे आवाहन सहाय्यक ग्रंथालय संचालक दत्तात्रेय क्षीरसागर यांनीयांनी केले आहे.