भारत विकास परिषद तर्फे मोफत जयपूर फुट वाटप
पुणे-भारत विकास परिषद तर्फे जागतिक अपंग दिनानिमित्त अपंगांना मोफत जयपूर फुट प्रदान करण्यात आले.
कर्वे रोड येथील कार्यालयात श्री.नामदेव परीट-सांगली,अविनाश गोरे-अहमदनगर,तानाजी शेंडे-अकलूज,भाऊसाहेब जैनक-सासवड,त्रिंबक जाधव-औरंगाबाद, बाबू एडके-बार्शी यांना जयपूर फुट ,दत्ताजी चितळे,नितीन अग्रवाल यांचे हस्ते मोफत वाटप करण्यात .यावेळी विनय खटावकर,जयंत जेस्ते,मधुसूदन देवधर,अजित साळुंखे तसेच अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषद ,पुणे महानगर पश्चिम चे अध्यक्ष रघुनाथ ढोक,सुदाम धाडगे उपस्थित होते.
यावेळी नितीन अग्रवाल म्हणाले की रोजगार करण्यासाठी आमची संस्था लार्सन अँड टुबरो,पुणे तर्फे पूर्ण सहकार्य केले जाईल तर विनय खटावकर म्हणाले की भारत विकास परिषद तर्फे आतापर्यंत आम्ही जयपूर पुट देत होतो आता हात पण देणार आहोत तरि अपंग व्यक्ती ने संपर्क साधण्याचे आव्हान करून कोणाची शिफारस व कागदपत्रांची गरज नसल्याचे सांगितले .कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मधुसूदन देवधर तर आभार प्रदर्शन रघुनाथ ढोक यांनी मानले.