पुणे : काँग्रेसचे पुण्याचे उमेदवार मोहन जोशी यांनी आज सर्वसामान्यांच्या हस्ते जाहिरनाम्याचे प्रकाशन केले. विशेष म्हणजे यात एक रियल चौकीदार निमंत्रित होता. मोदी में भी चौकीदार म्हणत प्रचार करत असताना काँग्रेसने थेट खऱ्या चौकीदाराला पाचारण केले. या चौकीदाराने मोदी स्वत:ला चौकीदार म्हणवून घेतात याबद्दल नाराजी व्यक्त केली. मोदी हे सर्वसामान्यांचे नाही तर अदानी, अंबानी यांचे चौकीदार असल्याचे तो यावेळी म्हणाला.
काँग्रेसने पुण्याचा जाहीरनामा समता भूमी फुले वाडा येथे प्रकाशित केला.यावेळी कॉंग्रेसच्या मान्यवर आजी माजी लोकप्रतिनिधी,पाधिकारी यांच्या सह ज्येष्ठ नागरिक पुष्पा कांबळे, दिव्यांग सुनिल कांबळे, ज्येष्ठ नागरिक हिराभाई भोंडे, विद्यार्थिनी आरती दासरी, रिक्षा संघटनेचे बापू धुमाळ, पथारीवाले गोवर्धनदास रहेजा, आशा वर्कर लक्ष्मी धोत्रे, तृतीयपंथी सानवी ज्ञानेशवर मोरे, रखवालदार महंमद इस्माईल सिकंदर शेख, शिक्षिका सबा शेख, जॅकलिन फॅसिस्टर, विद्यार्थिनी फीजा सलीम शेख. उपस्थित होते
सुरक्षित पुणे, हरित पुणे, गतिमान पुणे, आनंदी पुणे यावर जाहीरनाम्यात भर देण्यात आला आहे. जनतेला अपेक्षित असलेला विकास, त्यांची शहरासाठीची स्वप्ने, पुणे शहराच्या शाश्वत विकासाचे मॉडेल या मुद्यांचा जाहीरनाम्यात प्रामुख्याने समाविष्ठ आहे. हा जनतेच्या मनातील जनतेची स्वप्न पूर्ण करणारा, शहराचा सर्वांगीण विकास करणारा जाहीरनामा असल्याचे काँग्रेसतर्फे सांगण्यात आले.
मोहन जोशी यांनी कष्टकऱ्यांच्या हस्ते जाहीरनामा प्रकाशित केला. यावेळी मोहंमद इस्माईल शेख हे खरेखुरे चौकीदार सुद्धा उपस्थित होते . शेख म्हणाले, मोदी हे सर्वसामान्यांचे नाही तर अंबानी, अदानी, मल्ल्या आणि निरव मोदी यांचे चौकीदार आहेत. खऱ्या चौकीदाराचं काम समजून घ्यायचं असेल तर बारा तास काम करून पहा, मग तुम्हांला समजेल असा टोलाही चौकीदार मोहंमद इस्माईल शेख यांनी लगावला.