पुणे- स्त्री सन्मान व स्त्री- शिक्षण क्षेत्रामध्ये उल्लेख्लीय कामगिरी करणाऱ्या भारतरत्न महर्षी डॉ धोंडो केशव कर्वे (अण्णा) यांच्या कर्वे रस्त्यावरील पुतळा शुशोभिकारणाच्या नावाखाली गेल्या तीन वर्षापासून हटविण्यात आलेला असून पुतळ्याचे काम देखील बंद अवस्थेत असल्याने अण्णांचे चाहते व बहुतांशी पुणेकरांच्या भावना दुखावल्या जात असून त्यांच्या महान कार्याचा पुणे महानगरपालिका प्रशासनास विसर पडला आहे की काय ? असा सवाल करीत १५ दिवसात महर्षी अण्णांच्या पुळ्याच्या कामास गती मिळून काम पूर्ण न झाल्यास महापौरांना भेटून आंदोलन तीव्र करण्याचा इशारा कर्वे समाज सेवा संस्थेचे संचालक डॉ दीपक वलोकर यांनी दिला आहे.
भारतरत्न महर्षी डॉ धोंडो केशव कर्वे (अण्णा) यांच्या कर्वे रस्त्यावरील कोथरूड परिसरात असणारा पुतळा महानगर पालिका प्रशासनाकडून काही वर्षांपासून पुतळा शुशोभिकारणाच्या नावाखाली हटविण्यात आलेला असून सद्यपरीस्थितीमध्ये पुतळ्याच्या शुशोभिकरणाचे काम जवळ –जवळ बंदच आहे किंवा कासव गतीने काम सुरु असून निदान दि ९ नोव्हेंबर या महर्षी अन्नाच्या स्मृतीदिनी तरी त्यांच्या रखडलेल्या पुतळ्याच्या कामाची पूर्तता होणे अपेक्षित असताना देखील पुतळा उभारला गेला नाही. शिवाय या कामाकडे स्थानिक लोकप्रतिनिधी, महापौर व महानगरपालिका प्रशासन हे जाणून-बुजून दुर्लक्ष करीत असल्याची व “बजेट” मुळे काम रखडून पडल्याची नागरिकांमध्ये चर्चा असल्यामुळे व बहुतांशी पुणे करांच्या भावना दुखावल्या जात असल्यामुळे महर्षी अण्णांच्या नवे सुरु असलेल्या आमच्या कर्वे समाज सेवा संस्थेतर्फे यामध्ये लक्ष घालून रखडलेल्या कामाबाबत महापौरांकडून आढावा घेऊन या कामाचा पाठपुरावा करण्याचा निश्चय केला असल्याची माहिती डॉ दीपक वलोकर यांनी दिली.
आज सकाळी ११ वाजल्यापासून कर्वे समाज सेवा संस्थेच्या समाजकार्य महाविद्यालयाच्या सर्व शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी, रिसर्च व सी.एस. आर. सेल चे कर्मचारी व विद्यार्थ्यांनी एकत्र येऊन कर्वेनगर येथील महाविद्यालयाच्या प्रांगणापासून ते कोथरूड येथील प्रस्तावित पुतळा ठिकाणापर्यंत भारतरत्न महर्षी डॉ धोंडो केशव कर्वे (अण्णा) यांच्या रखडलेल्या कामाच्या निषेधार्त “ काळ्या फिती बांधून व निषेधाची पोस्टर्स घेऊन मूक निषेध फेरी काढत महानगरपालिका प्रशासनाकडून होत असलेल्या पुतळ्याच्या कामाच्या दिरंगाईबद्दल निदर्शने” करून निषेध व्यक्त केला. आणि महर्षी अण्णांचा पुतळा लवकरात-;लवकर उभा करावा अशी मागणी करण्यात आली.
संस्थेचे संचालक डॉ. दीपक वलोकर, डॉ. महेश ठाकूर, प्रा. चेतन दिवाण, व्यवस्थापन समिती समन्वयक प्रसाद कोल्हटकर, प्रा. चित्रलेखा राजुस्कर, अधीक्षक सतीश खुडे यांनी निषेध फेरीमध्ये सहभाग घेतलेल्या विद्यार्थ्यांना संबोधित करून मार्गदर्शन केले.