Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0

रोहित राऊत आणि हरगुन कौर यांनी गायले ‘तू अशी जवळी राहा’चे शीर्षक गीत

Date:

झी युवाने अवघ्या २ वर्षांच्या कालावधीतच वैविध्यपूर्ण कार्यक्रम सादर करून महाराष्ट्रातील तमाम प्रेक्षकांच्या मनाचा ठाव घेतला. वेगवेगळ्या विषयांना हात घालणाऱ्या कथा आणि त्यांच्या सादरीकरणातील नावीन्य यामुळे झी युवा या वाहिनीने प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. झी युवा वाहिनीच्या प्रेक्षकांची ऑक्टोबर महिन्याची सुरुवात देखील तितक्याच धमाकेदारपणे झाली आहे कारण नुकतंच झी युवाने आपल्या लाडक्या प्रेक्षकांसाठी ‘तू अशी जवळी राहा’ ही नवी मालिका सादर केली आहे. या मालिकेत अभिनेत्री तितिक्षा तावडे आणि अभिनेता सिद्धार्थ बोडके हे दोघे प्रमुख भूमिका साकारत आहेत. नावाप्रमाणे ही मालिका एक परिकथेतील प्रेमकथा नसून ही कथा आहे वेड्या प्रेमाची.

मालिकेत सिद्धार्थ बोडके राजवीरची भूमिका निभावत आहे जो एक अत्यंत चाणाक्ष मुलगा आहे ज्याला पराभव मान्य नाहीये आणि दुसरीकडे तितिक्षा तावडे ही मनवाची व्यक्तिरेखा साकारत आहे,  जी एक स्वतंत्र आणि स्वावलंबी मुलगी आहे. ही बाकीच्या प्रेमकथांपेक्षा थोडी वेगळी कहाणी आहे. दोघांच्या वेगळ्या स्वभावामुळे त्यांच्यासमोरील आव्हानांभोवती मालिकेचे कथानक फिरणार आहे.

या मालिकेचं शीर्षक गीत देखील तितकच श्रवणीय आहे. त्याची एक झलक झी युवाच्या सोशल मीडियावर टिझर रूपात पोस्ट केली असून हे गाणं प्रेक्षकांच्या भलतच पसंतीस पडलं आहे. हे गाणं संगीत सम्राट पर्व १ चा निवेदक आणि सुप्रसिद्ध गायक रोहित राऊत आणि संगीत सम्राट पर्व २ ची स्पर्धक हरगुन कौर यांनी गायलं आहे. मराठी सिनेसृष्टीला अनेक हिट गाणी गाणी देऊ केलेल्या संगीतकार अविनाश विश्वजित या जोडीने या शीर्षक गीताला चालबद्ध केले आहे. गाण्याला त्याच्या शब्दांमुळे अर्थ येतो आणि या गाण्याचे बोल तितकेच सुंदर आहेत जे वैभव जोशी यांनी लिहिलेत.

या शीर्षक गीताबद्दल बोलताना रोहित राऊत म्हणाला, “तू अशी जवळी राहा मालिकेचं शीर्षक गीत हे मालिकेला अगदी साजेसं आहे आणि ते प्रेक्षकांना देखील नक्कीच आवडेल. संगीत सम्राट पर्व २ची स्पर्धक हरगुनसोबत मी पहिल्यांदा गाणं गायलं आहे आणि हरगुनने तिला मिळालेल्या या संधीचं सोनं केलंय. आम्ही दोघे देखील प्रेक्षकांचा प्रतिसाद जाणून घेण्यासाठी उत्सुक आहोत.”

संगीत सम्राट पर्व २ ची स्पर्धक हरगुन म्हणाली, “संगीत सम्राट पर्व २ मुळे मला ही सुवर्णसंधी मिळाली. सुप्रसिद्ध संगीतकार जोडी अविनाश विश्वजित आणि लोकप्रिय गायक रोहित राऊत या महारथींसोबत गायचा माझा पहिला अनुभव होता आणि ही संधी मला दिल्याबद्दल मी झी युवाची आभारी आहे.”

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

पुण्याला पुस्तकाची जागतिक राजधानी करणार-उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील

पुणे महोत्सव खऱ्या अर्थाने भारतीय विचार, संवाद आणि संस्कृतीचा...

एक कोटी शेळ्या सोडण्याचा निर्णय हास्यास्पद:अजित पवारांनी फेटाळला वनमंत्र्यांचा प्रस्ताव

नागपूर-राज्यात बिबट्यांचा हैदोस दिवसेंदिवस तीव्र होत चालला असून मानवी...

मुंबईत 36 दिवसांत 80 हून अधिक मुलं-मुली बेपत्ता:सरकार आकडे लपवत आहे- सचिन अहिर यांचा आरोप

नागपूर -मुंबईमधून गेल्या 36 दिवसांमध्ये 80 हून अधिक मुलं-मुली...

एकनाथ शिंदे दोन महिन्यांत पुन्हा मुख्यमंत्री होणार:प्रकाश आंबेडकर यांनी वर्तवली शक्यता

मुंबई-राज्यातील महायुतीमध्ये झालेल्या अंतर्गत कलहाच्या आणि नाराजीच्या नाट्यानंतर वंचित...