प्रेम हे असेच असते सरल्यावरही उरते उरल्यावरही बहरत राहते. प्रेमात वाद नको असतो तर संवाद हवा असतो , प्रेमात राग नको असतो तर अनुराग हवा असतो , जीव देणे नको असते पण जीवाला जीव लावणे हवे असते. प्रेम ही भावनाच अमर्याद आहे. प्रेमात आखंड बुडणे, एखाद्या व्यक्तीसाठी प्रेमात सर्वस्व त्यागणे हि भावनाच वेगळी आहे . अश्याच काहीश्या विचारांनी बहरलेली “समर्पण “ ही नवीन गोष्ट झी युवा तुमच्यासाठी घेऊन येत आहे ..प्रेम हे या मालिकेतील नव्या एपिसोडमध्ये दिव्येश आणि रमाची अमर कहाणी झी युवावर , येत्या सोमवार ३ एप्रिल आणि मंगळवार ४ एप्रिल रात्री ९ वाजता ,पाहायला मिळेल .
आरोह वेलणकर म्हणजेच या गोष्टीतला दिव्येश, हा अतिशय श्रीमंत घरातील मुलगा असून अनेक वर्षे अमेरिकेत राहत होता .आधी अमेरिकेत आणि आता भारतात आल्यावरही त्याची समाजाची नाळ कधीच तुटली नाही . अतिशय सुस्वभावी आणि सुशिक्षत असा दिव्येश हा अतिशय जीव लावणारा मुलगा. तर अश्विनी कासार म्हणजेच या गोष्टीतील रिमा , ही मध्यमवर्गीय घरातील पण जबाबदारीची जाणीव असेलेली मुलगी , वडील गेल्यानंतरही खंबीर पाने घर सांभाळणारी दिव्या अतिशय स्वावलंबी आणि निरागस मुलगी आहे . दिव्येश चे वडील मिस्टर कारखानीस म्हणजेच यतीन कारेकर . ही गोष्ट तशी जुनी पण तेवढीच नवीन आहे . यात प्रेम आहे , राग आहे , द्वेष आहे , मत्सर आहे सूड आहे , आणि मुख्य म्हणजे समर्पण आहे . गोष्ट सुरु होते रिमाच्या घरावरून , दिव्येशचे वडील म्हणजेच कारखानीस हे मोठे बिल्डर असून त्यांना रिमाचे घर हवे आहे . वाट्टेल ते मार्ग वापरून ते रिमा आणि तिच्या आईला तिथून काढण्याचा प्रयत्न करत असतात. दिव्येश सुद्धा पहिला बिझिनेस पॉईंट च्या दृष्टीने वडलांना मदत करतो . पण हळू हळू निरागस रिमाच्या प्रेमात पडतो . रिमालाही दिव्येश आवडू लागतो.पण … या पण च्या पलीकडे असं बरंच काही आहे जे पाहून प्रेम केलेल्या प्रत्येकाचे मन हळहळेल. हि गोष्ट आहे ओंजळ भरलेल्या पाण्यासारखी, नकळत ओंजळ रिकामी होते , मग उरतो तो फक्त ओलावा प्रत्येक आठवणीचा.

