Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0

सुरेश वाडकर आणि स्वप्नील बांदोडकर यांच्या आवाजाने महाराष्ट्र मंत्रमुग्ध होणार !!!

Date:

झी युवाचा “सरगम” हा कार्यक्रम सध्या प्रेक्षकांच्या पसंतीला उतरला आहे.त्यांचे नियोजित कार्यक्रम सोडून सध्या या कार्यक्रमाकडे पाहण्याचा ओघ वाढत आहे . सरगम मध्ये आजपर्यंत  संगीत क्षेत्रातील दिग्गज नावांनी ह्या व्यासपीठावर येऊन त्यांची कला लोकांसमोर एका वेगळ्या रूपात आणली आहे . शंकर महादेवन यांच्यापासून झी युवावर  सुरु झालेला हा संगीतमय प्रवास , आनंद शिंदे, आदर्श शिंदे ,लोकशाहीर  नंदेश उमप यांनी एका वेगळ्याच उंचीवर नेऊन ठेवला आहे  . या आठवड्यात २२ मार्च  आणि २३ मार्च ला सरगम प्रेक्षकांचा उचांग गाठणार आहे . बुधवार २२ मार्च ला  रात्री ९ वाजता सुप्रसिद्ध पार्श्वगायक सुरेश वाडकर यांचा एपिसोड आहे तर गुरुवार २३ मार्च रोजी रात्री ९ वाजता स्वप्नील बांदोडकर हे आपली कला सादर करणार आहेत .  गोड गळ्याचे सुप्रसिद्ध पार्श्वगायक सुरेश वाडकर आणि तरुणाईच्या गळ्यातील ताईत असणारा स्वप्नील बांदोडकर यांचे एकामागोमाग एक गायकी अनुभवण्याची सुवर्णसंधी रसिकांसाठी चालून आली आहे.स्वप्नील बांदोडकर या नावाची खरतर वेगळी अशी ओळख करून द्यायची गरजच नाही. सुमारे शंभर मराठी चित्रपट आणि विविध भाषांमधील पाचशेहून अधिक गाणी गाणारा स्वप्नील मराठीमधला सर्वात लोकप्रिय गायक आहे असं म्हटल्यास वावगं ठरणार नाही . पण फक्त मराठीच नव्हे तर हिंदी, बंगाली, आसामी, गुजराती, तामिळ, भोजपुरी आणि ओरिया अशा अनेक भाषांत त्याच्या सुरील्या आवाजाची जादू रसिकांवर पसरली आहे. सध्याच्या नविन पिढीवरच नाही, तर जुन्या पिढीच्या ओठी पण हल्ली त्याचीच गाणी आढळत आहेत तर सुरेश वाडकर हे तर स्वप्नील चे गुरु . जर शिष्य एवढा गुणी असेल तर गुरुची माहिती काय ती सांगावी . सुरेश वाडकरांचा बॉलीवूड मधील दबदबा मोठा आहे . त्यांनी गायलेली लागी आज सावन की “, “तुमसे मिल्के  ऐसा लगा “, छोड आये हम वोह गलीया … ही आणि अशी असंख्य गाणी वर्षोनवर्षे संगीत क्षेत्रात अजरामर आहेत .. हिंदी आणि मराठी सिनेमामध्ये पार्श्वगायन करताना आणखी अनेक भाषांमध्ये त्यांचे प्रभुत्व आहे  आणि असेही सुरेश वाडकर यांच्याबद्दल कोणाला माहित नाही असा प्रेक्षक महाराष्ट्रात सापडणे कठीण. सरगम या कार्यक्रमात नवीन टायलेंट म्हणून त्यांच्या आजीवासनमधील दोन शिष्यांसोबत गाणार आहेत आणि त्यातील एक शिष्या दुसरी कोणीही नसून सुरेश वाडकर यांची मोठी मुलगी अनन्या आहे. बुधवार २२ मार्च च्या एपिसोड मध्ये महेश कोठारेंची एक विशेष एन्ट्री सुद्धा असणार आहे.

 

सरगम या कार्यक्रमात सुरेश वाडकर दयाघना , हृदयी प्रीत जागते , जिथे सागरा धरणी मिळते , पहिले ना मी तुला , रश्मे उल्फत , झन झान छेदिल्या तारा , ओह है जरा खफा खफा , प्रियतम्मा ,अग अग पोरी फसलीस ग  , कानडा राजा पंढरीचा , विठ्ठल आवडी  ह्या गाण्यांनी आपल्याला मंत्रमुग्ध करणार आहेत तर स्वप्नील बांदोडकर मला वेड लागले , केव्हा तरी पहाटे , तुला पाहिले, हा चंद्र तुझ्यासाठी , स्वर आले दुरुनी , गालावर खळी आणि  राधा हि बावरी या गाण्यांनी वेड लावणार आहेत . २२ आणि २३ मार्च  बुधवार आणि गुरवार रात्री ९ हे प्रेक्षकांना एक स्वर्गीय आनंद देतील .

 

सरगम हा कार्यक्रम कॉटन किंग प्रस्तुत करीत असून स्किनसिटी सह प्रायोजक आहेत आणि महा केशामृत स्पेशल पार्टनर आहेत .”सरगम” या कार्यक्रमाच्या सूत्रसंचालनाची जवाबदारी उर्मिला कोठारे यांनी उचलली आहे. आदिनाथ कोठारे या कार्यक्रमाचे क्रिएटिव्ह डायरेक्टर आणि निर्माते आहेत. ह्या कार्यक्रमाचे  शीर्षक गीत शंकर महादेवन यांनी गायले असून मंदार चोळकर याने ते लिहिले आहे आणि सिद्धार्थ आणि सौमिल यांनी संगीतबद्द केले आहे. “सरगम” हा कार्यक्रम दर बुधवार आणि गुरवार रात्री ९ वाजता झी युवावर पाहता येईल.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

चमत्कार! तो प्रवासी भयावह विमान अपघातातून वाचला…

अ हमदाबाद-लंडन विमानाचा आज भीषण अपघात झाला आहे. सुमारे...

अहमदाबाद विमान अपघातामुळे काँग्रेसचे मतचोरी विरोधातील मशाल मोर्चे १५ जून पर्यंत स्थगित

गडचिरोली/मुंबई दि १२ जून २५नरेंद्र मोदी हे ११ वर्षापासून...

बाळासाहेब दाभेकर यांच्या वाढदिवसा निमित्त सदानंद मोरे यांच्या हस्ते सत्कार अन रक्तदान शिबीर संपन्न.

पुणे (दि.१२) -सामाजिक कार्यकर्ते बाळासाहेब दाभेकर यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने...

जिल्हा परिषदेच्या ‘पुणे मॉडेल स्कूल’ उपक्रमाचा १४ जून रोजी शुभारंभ

पुणे, दि. १२ : पुणे जिल्हा परिषदेच्या वतीने शिक्षण...