Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0

होम मिनिस्टरचा मकर संक्रांत स्पेशल खेळ

Date:

 

महाराष्ट्रातील घराघरांत लोकप्रिय असलेला आणि ज्यात सहभागी व्हावं असं प्रत्येक महिलेचं स्वप्न असलेला कार्यक्रम म्हणजे झी मराठीचा होम मिनिस्टर. मागील बारा वर्षांपासून अविरतपणे हा कार्यक्रम प्रेक्षकांचं मनोरंजन करतोय. हा कार्यक्रम सादर करणारे निवेदक, सूत्रधार आदेश बांदेकर हे तर घराघरांत भावोजी म्हणून लोकप्रिय ठरले आहेत. महाराष्ट्रातील विविध शहरांत जाऊन, गावात जाऊन होम मिनिस्टरने तेथील महिलांना या खेळात सहभागी करुन घेत त्यांना पैठणीसहित आनंदाचे अनेक क्षण दिले. आजही सायंकाळची साडे सहाची वेळ ही प्रेक्षकांसाठी झी मराठी आणि होम मिनिस्टरकरिता हक्काची वेळ असते. आपली हीच लोकप्रियता टिकवत हा कार्यक्रम आजही प्रेक्षकांना मनोरंजनाची मेजवानी देत आहे. छोट्या पडद्याच्या विश्वात सलग बारा वर्षे चालणारा एकमेव दैनंदिन कार्यक्रम ही होम मिनिस्टरची आणखी एक ओळख. एका ठराविक अंतरानंतर एखादं नविन पर्व आणत विविध वयोगटांतील महिलांना सहभागी करुन घेण्याचा मानस होम मिनिस्टरचा आहे. सणाच्या निमित्ताने सादर होणा-या भागांचं तर वैशिष्ट्य काही औरच. वर्षाच्या सुरुवातीला येणारा पहिला मराठी सण म्हणजे मकर संक्रांती. तिळगुळ घ्या गोड गोड बोला म्हणत नात्यातील गोडवा जपण्याचा संदेश देणारा हा सण. या गोड सणानिमित्त होम मिनिस्टरचा एक खास सोहळा प्रेक्षकांच्या भेटीस येतो आहे येत्या १५ जानेवारीला. ज्यात सहभागी होणार आहेत झी मराठीवर सध्या सुरु असलेल्या लोकप्रिय मालिकांमधील तुमच्या आवडत्या प्रमुख जोड्या. येत्या रविवारी सायंकाळी ७ वा. हा सोहळा झी मराठीवरुन प्रसारित होणार आहे.

डोंबिवली जिमखानामधील मैदानावर होम मिनिस्टरचा हा संक्रांत स्पेशल खेळ रंगला ज्यात झी मराठीच्या नायक नायिकांसह सामान्य महिलांनाही सहभागी होण्याची आणि पैठणीचा मान जिंकण्याची संधी मिळाली. ‘जय मल्हार’ मालिकेतील खंडोबाची भूमिका साकारणारे देवदत्त नागे आणि बानूची भूमिका साकारणारी ईशा केसकर, ‘माझ्या नव-याची बायको’मधील राधिका -अनिता दाते, शनाया – रसिका सुनिल, गुरुनाथ-अभिजित खांडकेकर, ‘खुलता कळी खुलेना’ मधील विक्रांत-ओमप्रक्राश शिंदे, मानसी-मयुरी देशमुख, मोनिका-अभिज्ञा भावे, ‘काहे दिया परदेस’मधील गौरी-सायली संजीव, शिव-ऋषी सक्सेना, ‘अस्मिता’-मयुरी वाघ आणि ‘हंड्रेड डेज’ मधील राणी-तेजस्विनी पंडित, नेहा-अर्चना निपाणकर आणि इन्स्पेक्टर अजय ठाकूर ही भूमिका साकारणारा आदिनाथ कोठारे आदी कलाकार सहभागी झाले होते.

या सर्व कलाकारांसोबतच उपस्थित महिलांच्या नावांमधून लकी ड्रॉ पद्धतीने निवड झालेल्या काही सामान्य महिलाही सहभागी झाल्या होत्या. होम मिनिस्टरच्या लोकप्रियतेचं सर्वात मोठं यश जातं ते आदेश भावोजींना. आपल्या खुमासदार निवेदनाने आणि खेळीमेळीच्या वातावरणात हा कार्यक्रम रंगवण्याचं कसब त्यांच्याकडे आहे आणि याचा प्रत्यय याही कार्यक्रमात आला. या सर्वांसोबत मजेदार खेळ खेळतांना आदेश भावोजींची उत्स्फूर्तता,  हजरजबाबीपणा आणि गमतीशीर निवेदनाने खेळात विशेष रंगत आणली. नायिकांमध्ये बाजी मारत पैठणी जिंकण्याचा मान मिळवला ‘काहे दिया परदेस’च्या गौरीने. यासोबतच काही खेळांमध्ये इतरही नायिकांना पैठणीचा हा मान मिळाला त्या कोण आहेत आणि खेळांमध्ये त्यांनी कशी धम्माल आणली हे या विशेष सोहळ्यातून बघायला मिळेल. मकर संक्रांतीच्या निमित्ताने रंगणारा होम मिनिस्टरचा हा रंगतदार सोहळा बघायला विसरु नका येत्या रविवारी, १५ जानेवारीला सायंकाळी सात वाजता फक्त झी मराठीवर.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

‘टीव्हीएस अपाचे’ची दोन दशकांची गौरवगाथा : ‘नेक्स्ट-जेन टीव्हीएस अपाचे आरटीआर २०० ४व्ही’च्या नव्या युगाचा प्रारंभ

भविष्यासाठी घडवलेली ही मोटरसायकल ‘ओबीडी२बी’ मानकांनुसार सुसज्ज; प्रगत तंत्रज्ञान,...

अहमदाबाद विमान अपघातात सर्व 242 प्रवाशांचा मृत्यू

अहमदाबादमध्ये एअर इंडियाचे बोईंग ७८७ ड्रीमलायनर विमान कोसळले आहे....

विमान अपघात:उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी केंद्राकडे केला तातडीने संपर्क

मुंबई, १२ जून २०२५ : अहमदाबाद विमानतळावर आज सकाळी...