पुणे :
बांधकाम व्यावसायिक, ‘यशबिल्डर्स’चे संस्थापक अशोक कटारिया यांच्या दक्षिण महाराष्ट्रातील बांधकाम, गृहनिर्माण क्षेत्रातील रौप्यमहोत्सवी योगदानाबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते शनिवारी सत्कार करण्यात आला. कोथरूड शाखा उद्घाटनानिमित्त ‘नागपूर नागरिक सहकारी बँक’ आयोजित कोथरूड येथील ग्राहक स्नेह मेळाव्यात हा सत्कार झाला.
यावेळी ‘यशबिल्डर्स’चे संचालक अक्षय कटारिया, प्रतिक कटारिया, पालकमंत्री गिरीश बापट, ‘नागपूर नागरिक सहकारी बँके’चे अध्यक्ष राजेश लखोटिया, अनुराधा पौडवाल उपस्थित होते.
अशोक कटारिया हे 25 वर्षापासून बांधकाम व्यवसाय क्षेत्रात कार्यरत असून, बांधकाम व्यावसायिकांच्या समस्या सोडविण्यासाठी कार्यरत असतात. यावेळी मुख्यमंत्र्यांना त्यांनी त्यांच्या प्रकल्पांची माहिती दिली.
अशोक कटारिया हे पिंपरी-िंचंचवड प्रमोटर्स-बिल्डर्स असोसिएशनचे माजी अध्यक्ष असून अलिकडेच त्यांना ‘अण्णासाहेब मगर बांधकाम व्यावसायिक भूषण’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

