भारतीय कामगार सेना आणि मरकळ येथील कपारो इंजिनिअरिंग कंपनी यांच्यामध्ये वेतन करार…

Date:

पुणे, दि. 03 सप्टेंबर: कोरोनाच्या जागतिक महासंकटाच्या पार्श्वभूमीवर कपारो इंजीनियरिंग इंडिया लिमिटेड कंपनीच्या व्यवस्थापनाबरोबर चर्चा करून भारतीय कामगार सेनेने वेतनवाढ करार पूर्णत्वास नेला आहे. कंपनीतील कामाची परिस्थिती आणि ब-याच काळापर्यंत चाललेल्या लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर औद्योगिक क्षेत्रात जे महासंकट आर्थिक क्षेत्रात आलेले आहे. त्या संकटावर मात करून कामगारांच्या इच्छा, अपेक्षा पूर्ण करत भारतीय कामगार सेनेने एकूण 10,100 रुपयांचे एकूण वेतन करार यशस्वी करण्यात यश आले आहे.

कंपनी व्यवस्थापनाकडून कामगारांना ज्या इतर सवलती देण्यात आल्या त्यामध्ये महिन्यातून एक दिवस पगारी रजा, कंपनीचे दोन युनिफॉर्म, एक जॅकेट, दोन टी-शर्ट तसेच सेक्युरिटी शुजचे दोन जोड देण्यात आले.

याप्रसंगी शिवसेना उपनेते व भारतीय कामगार सेनेचे सरचिटणीस डॉ. रघुनाथ कुचिक, कंपनी व्यवस्थापनाकडून सरोज शाहू,  शरद पाठक, प्रेम सिन्हा, तन्मय मुखर्जी आणि भारतीय कामगार सेनेचे कपारो युनिट अध्यक्ष विजय लोखंडे, संतोष कुमार, निलेश पाचपुते, अण्णा जुमळे यांनी करारावर स्वाक्षरी केल्या. सदर वेतनवाढ कराराने मरकळ औद्योगिक क्षेत्रातील वातावरण उत्साही आणि आनंददायी झाले आहे. 

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

378 वा बीज सोहळा:तुकोबांच्या नामगजराने देहूनगरी दुमदुमली

पुणे-जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांच्या नामगजराने गुरुवारी देहूनगरी दुमदुमली....

अजित पवार मृत्युप्रकरणी व्हीएसआर कंपनी मालकाची सीआयडीकडून 8 तास चौकशी:अपघाती मृत्यू, हलगर्जीपणा की घातपात ?

पुणे -दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या आकस्मिक मृत्यू प्रकरणात...

“चालू” ठेकेदारांना जोरदार झटका: स्थायी समितीचे नवे धोरण

''महापालिकेकडून केली जाणारी कामे दर्जेदार झाली पाहिजेत. पण खूप...

पुणे महापालिकेतील स्वीकृत सदस्य निवडीसाठी पैशाचा घोडेबाजार थांबवा:रमेश चेन्नीथलांकडे तक्रार

पुणे- येथील महापालिकेत स्वीकृत सदस्य म्हणून १ जागा कॉंग्रेसच्या...