Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0

तिसऱ्या कृष्णपटनम् पोर्ट गोल्ड इगल्स गोल्फ चॅम्पिअनशीप-कपिल देव आणि आंतरराष्ट्रीय ख्यातीचे गोल्फर अॅशली रॅमसे यांचा टुर्नामेंटमध्ये सहभाग

Date:

पुणे: तिसऱ्या कृष्णपटनम् पोर्ट गोल्डन इगल्स गोल्फ चॅम्पियनशीपचे आयोजन स्वँकी ऑक्सफर्ड आणि कंट्री क्लब, पुणे यांनी केले आहे.

या टुर्नामेंटमध्ये 100 पासून ते भारतभरातील 100 कंपन्यांचा सहभाग असेल. भारताचे लाडके कॅप्टन आणि क्रिकेटर व आता गोल्फर झालेले श्री. कपिल देव या टुर्नामेंटला सुरुवात झाली तेव्हापासून त्याची ओळख बनले आहेत. देव यांच्यासारखे महान खेळाडू या स्पर्धांमध्ये सहभागी होतील आणि विजेत्यांचा सत्कारही करतील.

आंतरराष्ट्रीय कीर्तीचे गोल्फऱ अॅशले रॅमसे या निमित्ताने टुर्नामेंटसाठी उपस्थित असतील आणि खेळाडूंशी संवाद साधतील. याशिवाय माधवन् आणि मंदिरा बेदी आदी सेलिब्रिटी गोल्फरही या स्पर्धेत सहभागी होतील.

श्री. कपिल देव या निमित्ताने म्हणाले की, “एक खेळाडू म्हणून मी खेळाला नेहमीच प्रोत्साहन देतो आणि गोल्फसारखा खेळ तर थरारक आहे, एखाद्याच्या व्यक्तिमत्त्वाचे प्रतिबिंब पाडणारा आहे, आणि आपली आब राखलेला हा खेळ आहे. या टुर्नामेंटमधील विजेत्यांचे, तसेच कृष्णपटनम् पोर्टसारखी टुर्नामेंट इतक्या भव्य प्रमाणावर सादर करणाऱ्या प्रायोजकांचे मी अभिनंदन करतो. यासारख्या स्पर्धांमुळे तरुण गोल्फरना जास्तीत जास्त प्रोत्साहन मिळणार आहे, आणि यामुळे भारतात क्रीडा प्रकाराला चालना मिळण्यास मदत होणार आहे.”

यानिमित्ताने कृष्णपटनम् पोर्ट कंपनी लिमिटेडचे एमडी श्री. सी ससिधर म्हणाले की, “प्रत्येक वर्षी ही स्पर्धा आम्ही अधिकाधिक उंचीवर नेण्याचा प्रयत्न करत असतो आणि आतापर्यंत आम्ही चार शहरांमध्ये या स्पर्धेचा विस्तार केला आहे. वैविध्यतेचा ध्यास असलेल्या अनेक गोष्टींमध्ये गोल्फ चॅम्पिअनशीपचा समावेश होतो, असा आमचा विश्वास आहे. याशिवाय आम्ही भारताची पहिली ओशन-लिंक्ड गोल्फ प्रॉपर्टी उभारण्याची प्रक्रिया राबवत आहोत. प्रतिभावानांसाठी उत्तम व्यासपीठ उपलब्ध व्हावे आणि आपल्या देशामध्ये गोल्फला प्रोत्साहन मिळावे हे आमचे ध्येय आहे.”

 कृष्णपटनम् पोर्ट गोल्डन इगल्स गोल्फ चॅम्पिअनशीपबद्दल

कृष्णपटनम् पोर्ट गोल्डन इगल्स गोल्फ चॅम्पिअनशीप TM ही पोर्टच्या `गोल्फिंग फॉर ग्रेटर गुड इनिशिएटिव’चा भाग आहे. ही स्पर्धा म्हणजे शिक्षण, आरोग्य, स्वास्थ, रोजगार यासारख्या विविध विषयांमध्ये जागरुकता पसरवणे आणि त्यांना पाठिंबा देणे यासाठी कार्यरत असलेल्या कंपनीचा सीएसआर प्रकल्प आहे, याद्वारे गोल्फशी संबंधित विविध उपक्रम राबवले जातात. सध्याची टुर्नामेंट निवृत्त झालेल्या सी-मॅन ट्रस्टसाठी आर्थिक मदत उभारेल. या टुर्नामेंट हाउसेसमध्ये सर्वोत्तम उद्योगक्षेत्रांचा समावेश आहे, यात भागीदार, ग्राहक आणि व्यावसायिक भागीदारांचा समावेशही असेल.

कृष्टणपटनम् पोर्ट ही समाजात गुंतवणूक करणारी फर्म आहे आणि कंपनीच्या सीएसआर प्रकल्प – सीव्हीआर फाउंडेशनद्वारे आरोग्यसेवा, शिक्षण, लाइव्हलीहूड जनरेशन, ट्रेनिंग आणि कम्युनिटी उभारणी उपक्रम यांना सुरक्षा कवच मिळावे म्हणून असंख्य प्रकल्प राबवण्यात येतात.

कृष्णपटनम् पोर्ट कंपनी लिमिटेडबद्दल

कृष्णपटनम् पोर्टला हैदराबादस्थित सीव्हीआर ग्रूपद्वारे प्रोत्साहन देण्यात आले आहे, हे एक खासगी आणि पूर्णपणे मालकीची भारताच्या किनारपट्टीवरील पोर्ट आहे, आंध्रप्रदेशातील निल्लोर जिल्ह्यात ते स्थित आहे.

कृष्णपटनम् पोर्ट हे जलद गतीने सर्व प्रकारच्या कार्गोसाठी पसंती असलेले पोर्ट बनत आहे आणि ते दाक्षिणी आणि मध्यवर्ती भारतात स्थित आहे, व्यवसायासाठी सिंगल विंडो यंत्रणा राबवणारे हे पहिले पोर्ट आहे. पोर्टचा ट्रान्झिट स्टोअरेज एरिया 6800 एकरांचा असून, हा देशातील सर्वात मोठ्या वॉटरफ्रंट एरिया 161 स्क्वेअर किमीचा आणि 20.5 मीटर खोलीचा एरिया आहे. याचा सध्याचा ड्राफ्ट 18.5 मीटर्स इतका असून, यात यात एक संपूर्ण 200,000 टन क्षमतेची केप वॅसल मावते.

कृष्णपटनम् पोर्ट कंपनी लिमिटेड (केपीसीएल)ची स्थापना आंध्र प्रदेश सरकारच्या बीओएसटी (बिल्ड-ऑपरेट-शेअर-ट्रान्सफर) या आदेशानुसार 50 वर्षांच्या सवलतीवर स्थापण्यात आली आहे, ही कंपनी तीन टप्प्यात पूर्ण केली जाणार असून, सध्या दुसरा टप्पा प्रगतिपथावर आहे.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

पुण्याचे मोहोळ जबाबदार:विमान प्रवाश्यांच्या हलाखीच्या स्थितीवर सोनाली देशमुख आक्रमक

परभणी:डीजीसीएने सप्टेंबर-ऑक्टोबरमध्ये तीन पत्रं पाठवली: इंडिगोला १८-२२% पायलट कमी...

गोव्यातील नाइट क्लबमध्ये सिलींडर स्फोट, 25 जणांचा मृत्यू

गोव्यातील अरपोरा परिसरात शनिवारी रात्री उशिरा एका नाईट क्लबमध्ये...

धनकवडीतील एकता सोसायटीला ८ कोटीची लाच मागणारा सहकार खात्याच्या विनोद देशमुख व भास्कर पोळला बेड्या

दोघे एसीबीच्या सापळ्यात; 30 लाखांचा हफ्ता घेताना रंगेहाथ पकडलंपुणे:...

पुणे कँटोन्मेंटमधील केंद्र शासनाच्या जागांवर जाहीर केलेल्या ‘वक्फ’ मालमत्तांची चौकशी करा

खासदार प्रा. डॉ. मेधा कुलकर्णी यांनी संरक्षण मंत्री राजनाथ...