Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0

उजनीत अजूनही मायनस २२ टक्के पाणी साठा ..

Date:

पुणे दि. 14 :पुणे परिसरातील खडकवासला ,पानशेत ,वरसगाव, आणि टेमघर या चारही धरणात आजमितीला गेल्या वर्षातील आजच्या तारखेला जेवढा पाणी साठा  होता त्याहून दुप्पट पाणी साठा  झाला आहे .म्हणजे गेल्या२०१५ मधील १४ जुलै ला या चारही धरणात सर्व मिळून ७.०६ टीएमसी एवढा पाणीसाठा होता तो यंदा आजच्या तारखेला १३.७४ टक्के पाणी साठा झाला आहे .एकीकडे अशी परिस्थिती असताना उजनी धरणाची परिस्थिती मात्र अवघड अशी आहे . येथे मायनस २२ टक्के उपयुक्त पाणी साठा  आहे. उजनी धरण हे महाराष्ट्रातील जायकवाडी व कोयना धरणानंतर सर्वात मोठे धरण असून, मृतसाठ्याबाबत सर्वात मोठे आहे. या धरणाची पाणी साठवण क्षमता ३३२० द. ल.घ. मी. (११८ टीएमसी) तर उपयुक्त साठवण क्षमता १५१७.१९ द. ल. घ. मी., मृतसाठवण क्षमता १८०२.८१ द. ल.घ. मी. उपयुक्त साठ्यापेक्षा(५३.५७ टीएमसी) मृतसाठा (६३.६५ टीएमसी) मोठे असलेले एकमेव धरण आहे.

ujni

गेल्या वर्षातील पावसाळ्यात 15 ऑक्टोबर 2015 पर्यंत धरणात फक्त 25 टीएमसी उपयुक्त पाणीसाठा होऊ शकला व जेमतेम धरण प्लस 14.60 टक्के झाले. जानेवारी 2016 मध्ये न्यायालयाच्या आदेशामुळे चासकमान व भामा आसखेड या धरणांमधून उजनी धरणात 1.32 टीएमसी पाणी सोडण्यात आले. अपेक्षेप्रमाणे धरणात पाणीसाठा झाला नसल्यामुळे कालव्यातून शेतीसाठी पाणी सोडण्यात आले नाही. उजनीचा मुख्य कालवा 226 कि.मी., डावा कालवा 119 कि.मी. उजव्या कालव्यावर अवलंबून असलेले लाखो एकर क्षेत्र पाण्याअभावी वंचित राहिले. त्यामुळे शेतावरील उभी पिके जळून राख झाली. शेती उत्पादन घटल्यामुळे शेतकर्‍यांचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले. अशी परिस्थिती असतानासुद्धा बोगद्यामधून-जोडकालवा सीना नदीमध्ये एकवेळेस पाणी सोडण्यात आले. त्याचबरोबर सोलापूर, पंढरपूर, मंगळवेढा व सांगोला या शहरांच्या पिण्यासाठी म्हणून चारवेळा पाणी सोडण्यात आले.याशिवाय 0.47  टीएमसी पाणी सोडून आष्टी तलाव भरुन घेण्यात आला. 2016 च्या या पावसाळ्यात दमदार पाऊस होणे ही काळाची गरज असून धरण पूर्ण क्षमतेने भरण्यासाठी 85 टीएमसी पाण्याची आवश्यकता आहे.सोलापूर,अक्कलकोट , पंढरपूर, सांगोला, मंगळवेढा, बार्शी, कुर्डुवाडी सह ४०० पेक्षा अधिक गावांना उजनी धरणावर अवलंबून रहावे लागते.

पुणे -जिल्ह्यात सरासरी 8.7 मि.मी. पाऊस

पुणे :  गेल्या चोवीस तासात जिल्ह्यातील बारामती व इंदापूर हे तालूके सोडून इतर  सर्व तालुक्यात पावसाने हजेरी लावली असून जिल्ह्यात सरासरी 8.7  मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. जिल्ह्यात आजअखेर एकूण 5347.4 मि.मी. एवढा पाऊस झाला असून तो सरासरी 411.3 मि. मी.  आहे.

बुधवार 14  जुलै,  2016 रोजी सकाळी आठ वाजेपर्यंतची पावसाची तालुकानिहाय आकडेवारी पुढील प्रमाणे( कंसात दि. 1 जून 2016 पासूनचा एकुण पाऊस).

हवेली 1.1 मि.मी.  (166.8 मि.मी.), मुळशी 30.7 मि.मी. (977.8 मि.मी.), भोर 25.4 मि.मी.  (646.2 मि.मी.), मावळ 21.6  मि.मी.  (890.2 मि.मी.), वेल्हा 23.8 मि.मी. (791.5 मि.मी.), जुन्नर 3.1 मि.मी. (483.8मि.मी.), खेड 4.0 मि.मी. (349.7 मि.मी.), आंबेगाव 1.6 मि.मी. (285.5 मि.मी.), शिरुर 0.6 मि.मी.  (145.7 मि.मी.), बारामती 0.0 मि.मी. (142.0 मि.मी.), इंदापूर 0.0 मि.मी. (190.1मि.मी.), दौंड0.4 मि.मी. (163.1 मि.मी.) आणि पुरंदर 0.4 मि.मी. (115.1 मि.मी.)

 

कळमोडी १०० टक्के; खडकवासला ९२ टक्के भरले…

पुर नियंत्रण कक्षाद्वारे कळविण्यात आलेला पुणे जिल्ह्यातील धरणांतील आज रोजी

14 जुलै, 2016 रोजीचा सकाळी 8 वाजताचा उपयुक्त पाणी साठयाचा तपशील पुढीलप्रमाणे आहे.

अ.क्र/ धरणाचे नाव /एकूण साठा द. ल. घ. मी./टक्केवारी /उपयुक्त साठा(टीएमसी)

1 जोगे./ 128.13/ 2.69/ 0.10

2 माणिकडोंह/ 85.40/ 22.76 /2.32

3 येडगाव/ 63.01/ 61.62/ 1.72

4 वडज/ 18.5 /46.06 /0.54

5 डिंभे/ 144.15 /32.75/ 4.09

6 घेाड/93.27 /20.52 /1.12

7 विसापूर/ 1.32/5.15/0.05

8 कळमोडी/ 42.87/ 100.00/ 1.51

9 चासकमान/ 136.34 /50.89 /3.85

आसखेड 112.44/ 45.56/ 3.49

11 वडीवळे/ 30.68 /66.74/ 0.71

12 आंद्रा/ 54.45/ 65.12/ 1.90

13 पवना/ 144.20/ 46.91/ 3.99

14 कासारसाई/ 14.98 /85.06 /0.48

15 मुळशी/ 304.93/ 55.84 /10.31

16 टेमघर/ 39.31/ 34.63 /1.28

17 वरसगाव /161.02/ 40.97 /5.25

18 पानशेत/ 161.76 /50.65 /5.39

19 खडकवासला/ 81.33/ 91.81 /1.81

20 गुंजवणी/ 40.13/ 65.34/ 1.41

21 नीरा देवधर/163.84 /47.75/ 5.60

22 भाटघर /322.33 /47.37/ 11.13

23 वीर /173.74/ 60.68 /5.71

24 नाझरे/ 1.735/ 0.00/ 0.00

25 उजनी/ 1174.01/ -41.45/ -22.20

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

सौर ऊर्जेच्या वापरामुळे विजेच्या दरात कपात करणार- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मागेल त्याला सौर कृषीपंप योजनेचा विक्रम,गिनीज बुकात नोंद डिसेंबर 5,...

हडपसर गोसावी वस्तीतील साजिद खानला पकडून २५ लाखाचे अंमली पदार्थ हस्तगत

पुणे - मेफेड्रॉन (एम.डी) या अंमली पदार्थाची विक्री करणारा...

भारतीयांच्या प्रेमाने, प्रतिसादाने भारावून गेलो-फ्रेंच नृत्यदिग्दर्शक झुआन ले यांची भावना

पुणे : "समकालीन नृत्य, हिप-हॉप, रोलर-स्केटिंग आणि दृश्यकाव्याचा अभिनव...

तरुणांनी पथनाट्यातून दिला बाल गुन्हेगारी रोखण्याचा संदेश

धनकवडी मधील आदर्श मित्र मंडळाचा शहरातील बाल गुन्हेगारी रोखण्यासाठी...