अजितदादा पवार यांच्या वाढदिवसानिमित्त सर्व शासकीय दाखले मोफत देणाऱ्या केंद्राचे उद्या खा. डॉ. अमोल कोल्हेंंच्या हस्ते उद्घाटन

Date:

नितीन कदम आणि अश्विनी कदम यांचा थेट जनसंपर्क अभियानाअंतर्गत महाइ सेवा केंद्राचे होणार उद्घाटन

पुणे- राज्याचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते अजितदादा पवार यांच्या वाढदिवसा चे औचित्य साधून नगरसेविका अश्विनी कदम आणि पर्वती विधानसभा मतदार संघाचे राष्ट्रवादीचे अध्यक्ष नितीन कदम यांनी आपल्या थेट जनसंपर्क आभियांच्या अंतर्गत सर्व शासकीय दाखले नागरिकांना मोफत देण्याचा उपक्रम सुरु करत असून त्याचे उद्घाटन आणि कदम दाम्पत्यांच्या महा इ सेवा केंद्राचे उद्घाटन उद्याच खासदार आणि अभिनेते डॉ. अमोल कोल्हे यांच्या हस्ते होत आहे .
नगरसेविका अश्विनी नितीन कदम यांचे जनसंपर्क कार्यालय,गुरुकृपा टॉवर, अरण्येश्वर चौक, पर्वती येथे उद्या शुक्रवारी सायंकाळी ६ वा.उद्घाटनाचा हा कार्यक्रम कोरोनाचे नियम पाळून करायचा असल्याने दक्षता घेऊन तो करणार आहोत असे सांगून नितीन कदम म्हणाले कि,’ अनेक नागरिकांना वेळोवेळी विविध शासकीय दाखल्यांची गरज लागते आणि वेळेवर मग त्यांची तारांबळ उडते काही समाज कंटक त्यांच्या वेळेचा फायदाही घेतात , नागरिकांना योग्य मार्गदर्शन न मिळाल्याने कधी कधी फसगत हि होते हे होऊ नये म्हणून जेव्हा नागरिकांना गरज असेल तेव्हा त्या त्या शासकीय दाखल्यांसाठी नागरिक येथे येऊ शकतात आणि मोफत त्यांना त्यांचे दाखले काढून देण्याचे काम येथून केले जाईल . महा ई सेवा केंद्रांच्या माध्यमातून विविध प्रकारची प्रमाणपत्रे, परवाने, अनुज्ञप्ती आणि इतर सेवा प्रदान केल्या जाणार आहेत. सर्वसामान्य नागरिक आवश्यक असणाऱ्या सेवांचा अर्ज ऑनलाईन स्वरूपात भरून आवश्यक व उपलब्ध त्या सेवा कोणत्याही अडथळ्याशिवाय प्राप्त करू शकणार आहेत. यामुळे नागरिकांना शासकीय कामकाजाबाबतीत मानसिक समाधानव वेळेची बचत होऊन दिलासा प्राप्त होणार आहे.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

बौद्ध धम्म हा मनःशांती ते विश्वशांती चा प्रतीक ~ केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले

बुद्धगया : भगवान गौतम बुद्धांनी आखिल मानवजातीच्या कल्याणासाठी...

नेपाळमध्ये बस महामार्गावरून नदीत कोसळली, 18 ठार:25 जखमी

काठमांडू:नेपाळमधील धादिंग जिल्ह्यात सोमवारी रात्री उशिरा एक बस महामार्गावरून...

हवामान विभागाचा 7 जिल्ह्यांना ‘येलो अलर्ट’,विदर्भात पावसाचा धुमाकूळ, तर कोकणात आंबा धोक्यात

मुंबई:रविवारी मध्यरात्रीपासून विदर्भातील नागपूर, भंडारा आणि गोंदिया जिल्ह्यांत विजांच्या...