पुणे- संध्याकाळ पर्यंत पुणे महापालिकेची मुख्य सभा चालली . अर्थात दुपारचा अर्धा तासाचा लंच ब्रेक घेवून … दिनांक २१ डिसेंबर २०१६ ची मुख्यसभा दुपारी …१२ वाजता सुरु झाली .. भोजन व्यवस्था ठेवलेली आहे असे सव्वादोन वाजण्याच्या सुमारास नगरसचिव सुनील पारखी यांनी सभागृहात सांगितले आणि माजी महापौर दत्ता धनकवडे यांचे भाषण सुरु झाले … पण आता वेळ झाली होती.. आणि भोजन व्यवस्था आहे म्हटल्यावर … धनकवडे यांचे भाषण ऐकण्यात रस वाटेना .. अशी मंडळी भोजन कक्षा कडे निघाली .ती जास्त संख्येने सभागृह सोडू लागली तेव्हा ..सभागृहात काही सदस्यांनी धनकवडे यांना विचारले हि अहो ,तुमचे म्हणणे कोणी ऐकत आहे काय ? याची गांभीर्याने दाखल घेत अखेर सभा अर्धा तास साठी तहकूब करण्यात आली. म्हणजे लंच ब्रेक म्हणू या…
आता जेवण झाल्यावर पुन्हा सभा सुरु झाली … आणि २४ बाय 7 चा म्हणजे २४ तास पाणीपुरवठा –साठी कर्जरोखे उभारणे ,आणि त्यासाठी सहायक नेमणे … सुरुवातीलाच यावर उपसूचना देण्यात आली .. एसबीआय कॅपिटल मर्चंट लि. या कंपनीला सहायक म्हणून नेमण्यास मंजुरी देण्यात आली मात्र कर्जरोखे उभारण्याचा विषय पुढील सत्रातील नवनियुक्त सदस्यांच्या मुख्यसभेपुढे ठेवावा अशी हि उपसूचना होती .. त्यावर सुरु झाली भाषणे …
जेवण झालेले दुपारी साडेतीन ची वेळ … अजून किती वेळ मुख्य सभा चालेल माहिती नाही … अशा स्थितीत डोळे मिटून, चिंतन करणे किंवा भाषण ऐकणे असा पर्याय काहींनी स्वीकारला असावा … पहा त्याची ही चित्रफीत …. (व्हिडीओ)

