पंतप्रधान मोदींचा सोशल मीडियाला रामराम ठोकण्याचा विचार

Date:

नवी दिल्ली – पंतप्रधान नरेंद्र मोदी लवकरच सोशल मीडिया सोडण्याच्या विचारात आहेत. आज (2 मार्च) सोमवारी संध्याकाळी पंतप्रधानांनी एक आश्चर्यकारक ट्विट केले. येत्या रविवारपासून मी सोशल मीडिया सोडणार असल्याचे या ट्विटमध्ये सांगितले आहे. यामुळे सोशल मीडियावर मोठी खळबळ माजली आहे. दरम्यान मोदीजी ट्विटर नाही तर द्वेष सोडा असा सल्ला काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी दिला आहे. फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब ही सोशल मीडिया अकाउंट येत्या रविवारपासून बंद करण्याचा माझा विचार आहे, असं मोदींनी ट्विटमध्ये म्हटलंय. यामुळे सर्वत्र वेगवेगळ्या चर्चा सुरू झाल्या आहेत. मोदींचे ट्विटरवर ५३.३ मिलिअन फॉलोअर्स आहेत. फेसबुकवर ४४, ५९७, ३१७ जण त्यांना फॉलो करतात. तर इन्स्टाग्रामवर त्यांचे ३५.२ मिलिअन फॉलोअर्स आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या राजकीय यशात सोशल मीडियाचा मोठा वाटा आहे. गुजरातचे मुख्यमंत्री ते देशाचे पंतप्रधान ह्या वेगवान राजकीय प्रवासात सोशल मीडियाची त्यांना मोठी मदत झाली. राजकीय विश्लेष सोशल मीडियावरील त्यांच्या सक्रियतेलाही महत्त्वाचे मानतात. गुजरातचे मुख्यमंत्री असताना सोशल मीडियावरून त्यांची लोकप्रियता वाढली होती. सोशल मीडियावरील मोदींची वाढती लोकप्रियता पाहून अनेक नेत्यांना सोशल मीडियाची वाट धरली. लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुकीवेळी उमेदवारांची नावांची घोषणाही सर्व राजकीय पक्ष सोशल मीडियावरच करतात.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

महापौर मंजुषा नागपुरे यांच्या पुढाकाराने सफाई कामगाराच्या मुलीच्या उपचाराचा मार्ग मोकळा

पुणे :पुणे महानगरपालिका अंतर्गत वानवडी क्षेत्रीय कार्यालयातील गोसावी आरोग्य...

378 वा बीज सोहळा:तुकोबांच्या नामगजराने देहूनगरी दुमदुमली

पुणे-जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांच्या नामगजराने गुरुवारी देहूनगरी दुमदुमली....

अजित पवार मृत्युप्रकरणी व्हीएसआर कंपनी मालकाची सीआयडीकडून 8 तास चौकशी:अपघाती मृत्यू, हलगर्जीपणा की घातपात ?

पुणे -दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या आकस्मिक मृत्यू प्रकरणात...

“चालू” ठेकेदारांना जोरदार झटका: स्थायी समितीचे नवे धोरण

''महापालिकेकडून केली जाणारी कामे दर्जेदार झाली पाहिजेत. पण खूप...