पुणे- राज्याचे कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी खासदार सुप्रिया सुळे यांच्याबाबत अपमानास्पद उदगार काढल्याप्रकरणी तात्काळ चौकशी करून कारवाई करावी आणि त्याबाबतचा अहवाल आम्हाला सादर करावा असे आदेश आज महिला आयोगाने राज्याच्या पोलीस महासंचालकांना दिले आहेत.
याबाबत आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर यांनी पोलीस महासंचालक यांनी लेखी पत्र दिले आहे त्यात म्हटले आहे कि,’सत्तार यांनी खासदार सुळे यांच्याबद्दल उदगार काढल्याची तक्रार राज्य महिला आयोगाकडे प्राप्त झाली आहे. महिलांना अपमानास्पद वागणूक देत, आक्षेपार्ह विधाने करत त्यांच्या प्रतिष्ठेला धक्का पोहोचवणे, कमी लेखणे, कर्तुत्वहनन करणार्या अशा वक्तव्याची आयोगाने दखल घेतली आहे. याप्रकरणी राज्याचे पोलिस महासंचालकांनी कायदेशीर कारवाई करण्यात करावी आणि त्याचा अहवाल तात्काळ सादर करावा असे आयोगाकडून सांगण्यात आले आहे.