नवी दिल्ली- भारतीय जनता पार्टी ची घसरती प्रतिमा सावरण्यासाठी आता संघाने थेट पक्ष बांधणीचे काम हाती घेत येत्या डिसेंबर महिन्यात किंवा त्यानंतर भाजपमध्ये मोठे फेरबदल करण्याच्या दृष्टीने हालचालींना प्रारंभ केल्याचे वृत्त आहे.यामध्ये प्रामुख्याने नरेंद्र मोदी यांच्या पंतप्रधान पदाला जोड देत नितीन गडकरी यांना उपपंतप्रधान करावे यादृष्टीने पावले उचलण्यास सुरुवात केली असल्याचे समजते आहे .
२०१९ ची निवडणूक या विषयावर आता संघ आणि भाजपा परिवारात मोठी चिंता व्यक्त करणारे वातावरण आहे . पंतप्रधान मोदी आणि अमित शहा यांचा करिष्मा आता संपल्याचे खुद्द भाजपमध्येच बोलले जाते आहे . वारंवार विदेश दौरे करणे , त्याचबरोबर ‘अच्छे दिन ‘चे घोडे उताणे पडणे … नोट बंदी आणि अगदी झेरॉक्स कॉपी पर्यंत पोहोचलेली जीएसटी, पेट्रोल, डीझेल, गॅसच्या आवाक्याबाहेरील किमती, प्रत्येकाला घर देण्याचे भंग पावू पाहणारे स्वप्न ,फसलेली जनधन अकावूंट योजना ,प्रत्येकाच्या बँक खात्यात १५ लाख रुपये ,परदेशातील काळे धन स्वदेशी आणण्याचे प्रयत्न अशा सर्व पातळीवर आता संघाने विचारमंथन करायला सुरुवात केली असून मोदींची लोकप्रियता घटल्याचा दावा ही विचारात घ्यायला सुरुवात केली आहे . पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहा भाजपचे अध्यक्ष आहेत ज्यांच्यावर या सर्व गोष्टींचे खापर फोडण्यात येत आहे .२०१९ च्या दृष्टीने भाजपची सत्ता सावरण्यासाठी आता मोठे फेरबदल करण्याची वेळ आल्याचे मानले जात आहे . दरम्यान
गुजरातच्या आधी हिमाचल प्रदेशात 9 नोव्हेंबर मतदान होणार असून 18 तारखेला निकाल जाहीरहोणार आहेत . गुजरात विधानसभा निवडणुकीची तारीख अद्याप जाहीर करण्यात आलेली नाही . या दोन्ही निवडणुका होईपर्यंत संघाने शांततेचे धोरण स्वीकारले असून त्यानंतर मोठे फेरबदल करण्याचे निश्चित केल्याचा समीक्षकांचा अंदाज आहे . ज्यामध्ये पंतप्रधानांच्या जोडीला उपपंतप्रधान म्हणून नितीन गडकरी यांची निवड केली जाण्याची दाट शक्यता वर्तविली जाते आहे .
दरम्यान भाजपचे अध्यक्ष अमित शहा यांच्यावर देखील पक्षाची मोठी भिस्त सध्या असून त्यांना शह देण्यासाठी ओमप्रकाश माथूरांचे नाव पुढे करण्यात येण्याची शक्यता आहे .
…. नितीन गडकरी उपपंतप्रधान होणार ?
Date: